नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अशोक भवर हे सोमवारी दुपारी रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर थेट गोळीबार केला. आरोपींनी सलग दोन गोळ्या झाडत भवर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. पहिली गोळी भवर यांच्या अंगाला न लागता हुकली, मात्र दुसरी गोळी उजव्या कंबरेजवळून घासून गेली. त्यामुळे सचिन भवर हे थोडक्यात वाचले. जखमी अवस्थेत ते स्वतः नेरळ पोलीस ठाण्यात गेले आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.
त्वरीत उपचार आणि पोलिसांची कारवाई
भवर यांची परिस्थिती लक्षात घेता नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या टीमने त्यांना तात्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही तपासणी सुरू केली. याच तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.
१५ गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपीचा शोध सुरू
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना समजले की गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एकाचा सचिन भवर यांच्याशी पूर्वीपासून वाद होता. आरोपी अविनाश जगनाथ मारके (वय ४५) हा काही वर्षांपूर्वी स्वामी समर्थ चाळीत भवर यांच्या जवळच राहत होता. त्यांच्यातील वैयक्तिक वादातूनच या गोळीबाराची घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अविनाश मारके हा धुळे शहरातील अंदाजे १५ गुन्ह्यांमध्ये वाँटेड असून सराईत गुन्हेगार आहे. सध्या तो फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
Ans: सचिन भवर
Ans: आरोपी अविनाश मारके हा १५ गुन्ह्यांमध्ये वाँटेड
Ans: रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे घटना घडली






