Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मीरा भाईंदरमध्ये एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण, गर्भपातासाठी भाग पाडणे आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे पारनेरमध्ये भोंदूबाबाने मतिमंद मुलगा बरा करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याचा आणि महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तरुणीचा आरोप; लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक शोषण, गर्भपात आणि धर्मांतरासाठी दबाव.
  • काशीगाव पोलिसांनी आरोपी व त्याच्या कुटुंबीयांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
  • पारनेरमध्ये भोंदूबाबाने उपचार व लग्न जमवून देण्याच्या आमिषाने साडेसहा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप.
मुंबई: मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आधी लग्नाचे आमिष दाखवले, नंतर शारीरिक शोषण केलं आणि दोन वेळा गर्भपातासाठी भाग पडल्याचं समोर आलं आहे. एवढेच नाही तर तिला धर्मांतरासाठी ही दबाव टाकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी तरुणीने मीरा भाईंदरमध्ये काशिमीरा परिसरातील काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव शाबास रज्जाक शेख असे आहे. २०२२ मध्ये मालाड येथील एका खासगी कंपनीत काम करत असताना पीडितेची ओळख आरोपीशी झाली. त्यांनतर दोघांमध्ये जवळीक वाढली. २०२३ मध्ये आरोपीने लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन केले. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे आरोपीने मीरा रोड परिसरात भाड्याचे घर घेऊन दिले असून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या काळात ती दोन वेळा गर्भवती राहिली होती, मात्र आरोपीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला आहे. तसेच लग्नासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

गुन्हा दाखल

२८ मे रोजी आरोपीच्या घरी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पित्याचा क्रूर चेहरा! ४ वर्षीय चिमुकला दुधासाठी रडला आणि जन्मदात्या पित्याने भिंतीवर आपटला

मुंबई येथील पवई परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ४ वर्षीय चिमुकल्याला भूक लागल्याने तो दुधासाठी रडत होता. याच रडण्याला कंटाळून जन्मदात्या पित्यानेच त्याला भिंतीवर आणि फरशीवर आपटून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पवई परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या मुलाचे नाव यश सिंग (वय ४) असे आहे. आरोपी वडिलांचे नाव राजेश प्रकाश सिंग आहे.  राजेश हा पवईतील गौतमनगर- मोरारजीनगर परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.

 

Crime News : बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: मीरा भाईंदरमधील तरुणीने कोणते आरोप केले आहेत?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण, गर्भपातासाठी भाग पाडणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.

  • Que: पारनेरमधील भोंदूबाबावर काय आरोप आहेत?

    Ans: मतिमंद मुलगा बरा करण्याचे व भावाचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक आणि महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पारनेरमधील मुख्य भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Mumbai crime physical abuse double abortion pressure for religious conversion case registered against young girls complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप
1

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Mumbai Crime : मैत्रीचे नाते संपले रक्तरंजित शेवटाने; मुंब्र्यातील थरारक हत्येचा उलगडा
2

Mumbai Crime : मैत्रीचे नाते संपले रक्तरंजित शेवटाने; मुंब्र्यातील थरारक हत्येचा उलगडा

एसटीच्या अतिरिक्त जागांचा विकास करताना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला पाहिजे; श्रीरंग बरगे यांचे वक्तव्य
3

एसटीच्या अतिरिक्त जागांचा विकास करताना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला पाहिजे; श्रीरंग बरगे यांचे वक्तव्य

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…
4

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.