Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: नेस्को सेंटर कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; 5 जण अटकेत

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून ड्रग्ज पुरवठ्याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 02:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोस; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • आणखी एक विद्यार्थी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू
  • 5 जण अटकेत; ड्रग्ज पुरवठ्याचा तपास
मुंबई: मुंबई येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 11 एप्रिलच्या सायंकाळी घडली.

Nashik Crime: नाशिकमध्ये दिवसाढवळ्या थरार! मिरची पूड टाकून महिलेने कोयत्याने तरुणावर केले सपासप केला वार; व्हिडीओ समोर

काय घडलं नेमकं?

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुमारे ३ ते ४ हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी अमली पदार्थ आणि मद्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले होते. यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. घटनेनंतर लगेचच त्यांना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मृत झालेले विद्यार्थी एका नामांकित महाविद्यालयात शिकत होते. या दुर्घटनेत आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.

पाच जणांना अटक

या प्रकरणी वनराई पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून गुन्हा दाखल केला आहे. आता पर्यंत ६ जणांना केली अटक केली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी या पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या आनंद पटेल या तरुणाला कल्याणमधून ताब्यात घेतले. पहाटे साडेपाचच्या सुमारास कल्याण येथील वायले नगर परिसरात असलेल्या घरातून पोलिसांनी आनंद पटेलला बेड्या ठोकल्या. पोलीस आल्यानंतर आनंद बराच काळ घराचा दरवाजा उघडत नव्हता. अखेर बरीच कसरत केल्यानंतर पोलिसांना आनंदला पकडण्यात यश मिळाले. खडकपाडा पोलिसांनी आनंद पटेल याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

दादरमध्ये थरार! जुन्या वैमनस्यातून पत्नीसमोरच तरुणाची हत्या; सहा जणांना अटक

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या देखत बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील दादर परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अंकुश आंबोरकर (वय ४०) असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

अंकुश आंबोरकर हा रविवारी रात्री दादरमध्ये आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी गौरव सणस याने त्याला रस्त्यात अडवले. याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांनी अंकुशला मारहाण सुरु केली. अंकुशची पत्नी प्रभादेवी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करते. इथून काही अंतरावरच अंकुशला मारहाण सुरु होती. ही बातमी समजताच अंकुशची पत्नी आपल्या काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेली. तिने अंकुशला गौरव आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सोडवले.

Karnataka Crime: प्रेयसीचा लग्न जुळलं, प्रियकराने खाजगी फोटो व्हायरल करून लग्न मोडले; तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: ड्रग्जच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 5 जणांना अटक करून तपास सुरू केला आहे.

  • Que: आणखी कोणी जखमी आहे का?

    Ans: हो, एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.

Web Title: Mumbai crime two students die of drug overdose at nesco center concert 5 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात
1

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
2

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

VIRAR : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, धारदार चाकूने वार करत पाडला रक्ताचा सडा
3

VIRAR : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, धारदार चाकूने वार करत पाडला रक्ताचा सडा

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला
4

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.