Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई लोकलमध्ये विरारच्या २२ वर्षीय मयंक लोहारची हत्या करणाऱ्या रोशन सुवर्णाला लोहमार्ग पोलिसांनी ६ पथकांच्या मदतीने २४ तासांच्या आत कुर्ल्यातून अटक केली आहे. या घटनेने लोकल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 24, 2026 | 09:16 PM
मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात (Photo Credit- X)

मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या!
  • मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात
  • वाचा संपूर्ण बातमी
Mumbai Local Train Murder: मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. मयंक लोहार (Mayank Lohar) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या थरारक हत्याप्रकरणानंतर लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत मुख्य आरोपी रोशन सुवर्णा (Roshan Suvarna) याला अवघ्या २४ तासांच्या आत कुर्ल्यातून अटक केली आहे.

पोलिसांनी असा रचला सापळा

या गंभीर घटनेची दखल घेत रेल्वे पोलिसांनी तात्काळ ६ स्वतंत्र तपास पथके नियुक्त केली होती. प्रत्येक पथकाकडे मुंबई आणि उपनगरांतील वेगवेगळ्या भागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मुंबईतच लपल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे मोबाईल लोकेशन आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुर्ला परिसरात सापळा रचला आणि रोशन सुवर्णाला बेड्या ठोकल्या. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत असून, लोकल डब्यातील वाद नेमका कसा पेटला आणि आरोपीकडे हत्यार कुठून आले? याचा तपास सुरू आहे.

Man who killed the salesman on Mumbai local arrested by police. Accused : Roshan Suvarna pic.twitter.com/jLHOz0LKGD — News Arena India (@NewsArenaIndia) June 24, 2026

Love Affair Murder : प्यार दीवाना…की रक्तरंजित वेड? NCRB च्या आकडेवारीतून भारतात ‘क्राईम ऑफ पॅशन’चे धक्कादायक वास्तव समोर

६ महिन्यांतील दुसरी मोठी घटना; मुंबईकरांचा सुरक्षेवर संतप्त सवाल

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांवर जीवघेणे हल्ले होण्याची गेल्या ६ महिन्यांतील ही दुसरी मोठी आणि अत्यंत चिंताजनक घटना आहे. याचवर्षी जानेवारी महिन्यात मालाड रेल्वे स्टेशनवर लोकलच्या गर्दीत झालेल्या किरकोळ वादातून एका कॉलेज प्रोफेसरवर चाकूहल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. रोज लाखो मुंबईकर आपल्या जीवाची बाजी लावून लोकलने प्रवास करतात. मात्र, या दोन्ही घटनांमुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा दाव्यांची पोलखोल झाली आहे.

लोकलमधील वाढती दहशत आणि प्रवाशांची मागणी

या दुर्दैवी घटनेनंतर लोकल प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून रेल्वे प्रशासनाला अनेक जाब विचारले जात आहेत. लोकल डबे, रेल्वे स्थानके आणि रुळांच्या आसपास नशाखोरांची आणि गुन्हेगारांची वाढती दहशत मोडून काढणार का? गर्दीच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी डब्यांमध्ये रेल्वे पोलिसांची (RPF/GRP) गस्त वाढणार का? चर्चगेट-नालासोपारा दरम्यान झालेल्या या रक्तरंजित घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासन जागे होऊन सुरक्षा चोख करणार का?

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल

Web Title: Mumbai local train murder accused roshan suvarna arrested through father interrogation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Mumbai
  • Mumbai Crime
  • Murder

संबंधित बातम्या

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव
1

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? आगामी दिवसांत होणार मोठा बदल, पाहा IMD चा नवा अंदाज!
2

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? आगामी दिवसांत होणार मोठा बदल, पाहा IMD चा नवा अंदाज!

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप
3

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

Handloom Exhibition Mumbai: पैठणीपासून पोचमपल्लीपर्यंत… राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबईत पारंपरिक वस्त्रांचा भव्य उत्सव
4

Handloom Exhibition Mumbai: पैठणीपासून पोचमपल्लीपर्यंत… राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबईत पारंपरिक वस्त्रांचा भव्य उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.