काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव जयश्री बिरादर (वय २२) असे आहे. जयश्रीचे २७ एप्रिल रोजी लग्न निश्चित करण्यात आला होता. साखरपुड्याचे सर्व विधी देखील आनंदाने पार पडले होते. लग्नाची तयारी आनंदाने सुरु होती. मात्र हा आनंदाचा वातावरण शोककळयात बदलला आहे. त्यामागचं कारण जयश्रीचे जुने प्रेमसंबंध. जयश्रीचे यापूर्वी श्रीशैल बदनूर नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. श्रीशैलला जयश्रीचा लग्न दुसरीकडे ठरल्याचे समजले तेव्हा त्याच्यामानात सूड निर्माण झाला. त्याने जयश्रीसोबतचे काही खाजगी फोटो ज्या तरुणाशी तिचे लग्न होणार होते, त्याच्या कुटुंबाला पाठवले. हे फोटो सासरच्या मंडळींच्या हाती पडताच त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. ठरलेले लग्न तुटल्यामुळे अपमान आणि सामाजिक बदनामीने जयश्रीला मानिसक धक्का बसला. यामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती.
मानसिक त्रासातून संपवले आयुष्य
याच मानसिक त्रासातून तिने आयुष्य संपवण्याचे निर्णय घेतले. काळ संध्याकाळच्या सुमारास जयश्रीने गावातील मदिना मशिदीजवळ असलेल्या एका विहिरीमध्ये उडी घेतली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दुर्दैवाने तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.जयश्रीच्या कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असून त्यांनी या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या श्रीशैल विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी श्रीशैल बदनूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Ans: खाजगी फोटो व्हायरल होऊन लग्न मोडल्यामुळे मानसिक तणाव.
Ans: तरुणीचे खाजगी फोटो तिच्या होणाऱ्या सासरकडे पाठवले.
Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.






