
crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबई: मुंबईतील भायखळा परिसरात निर्माणधीन बांधकाम करतांना झालेल्या अपघातात दोन कामगारांची मातीच्या ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.ही घटना हबीब मेन्शन येथे घडली. इमारतीच्या पायाभरणी आणि ढिगाऱ्याच्या कामादरम्यान माती आणि चिखलाचा काही भाग कामगारांवर कोसळला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण ५ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली आले होते. यातदोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी आहेत.
Nanded Crime: खूनाचा बदला खून! १६ वर्षांपूर्वी वडिलांची झाली होती हत्या, २० वर्षीय मुलाने घेतला बदला
काय घडलं नेमकं?
भायखळा येथील हबीब मेन्शन येथे निर्माणधीन इमारतीच्या पायाभरणी आणि ढिगाऱ्याच्या कामादरम्यान माती आणि चिखलाचा काही भाग कामगारांवर कोसळला. या ढिगाऱ्याखाली ५ कामगार आले होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार राहुल (वय 30 वर्षे) आणि राजू (वय 28 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातातील जखमींची नावे
1.सज्जाद अली (वय २५ वर्षे) जखमी, स्थिर
2.सोबत अली (वय २८ वर्षे) जखमी, स्थिर
3.लाल मोहम्मद (वय १८ वर्षे) जखमी, स्थिर.
CSMT वरून झालं होत अपहरण, वाराणसीतून पोलिसांनी केली सुटका
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एका चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाले होते. या चिमकलीचा शोध लावण्यात एमआरए मार्ग पोलिसांना अखेर यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील एका अनाथ आश्रमात पोलिसांना ही मुलगी सापडली असून तिला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
२० मे २०२५ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एका चिमुकलीचे अपहरण करण्यात आल होते. वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरवरून मुंबईला आलेले कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असताना अचानक त्यांच्या मुलीच अपहरण झाल होते. दरम्यान, अपहरणकर्त्याने चिमुकलीला आमिष दाखवलं आणि लोकलने तिला घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनसवर नेलं आणि तिथून पुढे भुसावळ, मध्यप्रदेश असा प्रवास करत थेट उत्तर प्रदेशला घेऊन गेला.
तुरुंगातून सुटताच तरुणावर हल्ला; रिक्षा थांबवली, टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली…
Ans: भायखळा
Ans: दोघे
Ans: मेन्शन