Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Crime: “गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या…”, लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन

Mumbai Local Crime News : मुंबई लोकलमध्ये 19 वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीन स्पर्श केल्याप्रकरणी एका 62 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुंबई लोकलचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का?

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 16, 2025 | 11:48 AM
"गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या...", लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन (फोटो सौजन्य-X)

"गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या...", लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Local Crime News in Marathi : मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो नागरिक लोकलमधून प्रवास करत असतात. मात्र काही हुल्लडबाज तरुणांमुळे लोकलमधील प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं.महिलांचा लोकल प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जातात. याचदरम्यान मुंबई लोकलचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दादर रेल्वे स्थानकावर एका ६२ वर्षीय आरोपीने लोकलमधील गर्दीचा फायदा घेत लोकलधील १९ वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. डीजी मखाण असे या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

Nashik crime : नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या, काय घडलं नेमकं?

ही घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. मखाण दिल्लीचे रहिवासी असून तहसीलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या मैत्रिणीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या फास्ट लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर पोहोचली. त्यावेळी पीडिता आणि तिची मैत्रिण खाली उतरत होत्या. त्यावेळी डब्यात खूप गर्दी होती.

पोलिसांना दिलेल्या माहितीत तरुणीने सांगितले की, “आरोपीने गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.” या घटनेनंतर तरुणीने दादर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. भारतीय न्यायिक संहितेअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. त्याला रेल्वे कोर्ट हजर केले असून कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

पोलिसांनी सांगितले की तक्रारदार तरुणी ही विद्यार्थीनी आहे. आरोपी डीजी मखाण याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

एका तरुणाला अत्याचार प्रकरणात अटक

दुसरीकडे, वंशवादातून एका शीख महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी एका एकाला अटक केली. बलात्काराच्या संशयातून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय ३० असून, त्याने वंशवादाने प्रेरित होऊन हल्ला केल्याने चौकशीचा भाग म्हणून ती व्यक्ती अजूनही ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्स भागात कोठडीत असल्याचे सांगण्यात आले. पीडित महिला २० वर्षांची असून, तपास सुरू असतानाही तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्यातील आरोपीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

Web Title: Mumbai local news marathi 62 year old delhi man held for molestation in crowded local near dadar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • railway

संबंधित बातम्या

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
1

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचणार, महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार
2

आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचणार, महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

Mumbai: महापालिका वाढवणार आरोग्यसेवेची गुणवत्ता! मुंबईतील रुग्णालयांमध्ये ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’
3

Mumbai: महापालिका वाढवणार आरोग्यसेवेची गुणवत्ता! मुंबईतील रुग्णालयांमध्ये ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’

BMC Water Bill Arrears: मुंबई पालिकेची तिजोरी रिकामी? सरकारी संस्थांकडून ₹३७३६ कोटींची पाणी बिल थकबाकी!
4

BMC Water Bill Arrears: मुंबई पालिकेची तिजोरी रिकामी? सरकारी संस्थांकडून ₹३७३६ कोटींची पाणी बिल थकबाकी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.