Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

Mumbai News : मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान मालाडच्या कुरार परिसरात घडलेल्या एका घटनेत ३५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ३ दिवसांच्या शोधकार्यानंतर अखेर नाल्यात त्याचा मृतदेह सापडला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 11:11 AM
Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसादरम्यान मालाडच्या कुरार परिसरात घडलेल्या एका घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
  • घटनेनंतर पोलिसांसह विविध यंत्रणांनी सलग तीन दिवस शोधमोहीम राबवली.
  • या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई शहराला पावसाने पछाडलं असून पाण्याच्या वेगवान प्रवाहात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. माहितीनुसार, सदर घटना मालाड (पूर्व) येथील कुरार परिसरात घडली असून चप्पल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ३५ वर्षीय योगेश शिवकुमार वर्मा याला आपला जीव गमवावा लागला आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहात योगेश वाहून गेला आणि मुख्य म्हणजे यात कुणीही त्याची मदत केली नाही. तीन दिवस शोधकार्य सुरु असतानाच बुधवारी योगेशचा मृतदेह बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोठ्या नाल्यातून बाहेर काढण्यात आला. योगेश हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून कुरारमध्ये तो त्याच्या आई आणि भावासोबत राहत होता.

Hyderabad Crime: POCSO प्रकरणातील आरोपीचा रक्तरंजित कहर; अल्पवयीन मुलीसह 7 जणांची निर्घृण हत्या, आरोपी फरार

नक्की काय घडलं होतं?

कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी साधरण १०.३० वाजताच्या सुमारास योगेश तानाजी नगरमधील खोट कुआँ नाल्याजवळून जात होता. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी सांगितले की, योगेश त्यावेळी नशेच्या धुंदीत होता. नाल्याजवळून जात असताना अचानक त्याची चप्पल तुडुंब भरलेल्या नाल्यात पडली. यानंतर चप्पल नाल्यातून बाहेर काढण्यासाठी तो किनाऱ्याजवळ गेला आणि इथेच पाण्याच्या प्रवाहाने त्याला आत खेचले. योगेशला नाल्यात वाहून जात असल्याचे पाहून उपस्थितांनी आरडाओरड करायला सुरुवात केली, परंतु काही सेकंदातच योगेश नाल्यातून पुढे वाहत अचानक गायब झाला.

३ दिवस सुरु होते शोधकार्य

घटनेची माहिती मिळताच, कुरार पोलिसांनी योगेशचा भाऊ मनोज शिवकुमार वर्मा याच्या तक्रारीच्या आधारावर बेपत्ता असल्याची नोंद केली. यानंतर पोलिसांनी एनडीआरएफ, कोस्ट गार्ड आणि स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने सलग तीन दिवस शोधकार्य सुरु केले. अखेर बुधवारी बांगुर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मोठ्या नाल्यात योगेशचा मृतदेह सापडला.

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

अकस्मात मृत्यूची नोंद

या प्रकरणात कुरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील गायकवाड यांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शींनी योगेशला नाल्याजवळ जाण्यास मनाई केली होती परंतु त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो न्लयात उतरला आणि या चुकीमुळेच त्याचा जीव पणाला लागला.

 

Web Title: Mumbai malad kurar man dies after being swept away in drain during heavy rains search operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • crime news
  • Death
  • Drowned in Water

संबंधित बातम्या

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
1

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
2

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
3

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
4

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.