Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ‘एका महिन्यात 50% परतावा’… या एका आमिषाने गमावले तब्बल 1 कोटी रुपये!

मुंबईत एका महिन्यात 50 टक्के परताव्याचे आमिष दाखवत मोहोसिन मुलानी यांची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मित्राच्या माध्यमातून आरोपींनी विश्वास संपादन करून रोख रक्कम स्वीकारली आणि पसार झाले. एल.टी. मार्ग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 50 टक्के परताव्याचे आमिष दाखवत 1 कोटी रुपयांची फसवणूक.
  • मित्राच्या ओळखीने विश्वास संपादन करून आरोपींनी रोख रक्कम स्वीकारली.
  • एल.टी. मार्ग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
मुंबई: एका महिन्यात 50 टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मित्राच्या माध्यमातून एका व्यक्तीची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. ट्रेड प्रॉफिट योजनेच्या नावाखाली आरोपींनी विश्वास संपादन करून रोख रक्कम स्वीकारली आणि काही क्षणांतच ते पसार झाले. या प्रकरणी एल.टी. मार्ग पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
50 टक्के परताव्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोसिन मुलानी यांचा मित्र अदनान इनामदार याने त्यांना ट्रेड प्रॉफिट योजनेची माहिती दिली. या योजनेत किमान 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास अवघ्या एका महिन्यात 50 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर इनामदारने मोहोसिन यांची शुभम राजूत याच्यासोबत बोरिवली येथे भेट घडवून आणली. शुभम राजूतसह इतर आरोपींनी विश्वास संपादन करत मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले.

Jalna Crime: पैशांच्या वादातून गळा आवळून हत्या; मृतदेह नदीत फेकला, डीएनए चाचणीने उघड केलं रहस्य

मोहोसिन मुलानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सफाळे येथील शुभम राजूत, तन्वेश पाटील, राजेंद्र सिंग, प्रकाश कदम, आकाश दुवे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध एल.टी. मार्ग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोख रक्कम घेताच आरोपी झाले पसार

आरोपींनी मोहोसिन मुलानी यांना मुंबईतील काळबादेवी परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ रोख रक्कम घेऊन येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे मुलानी तेथे एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन पोहोचले. आरोपींनी सर्व पैसे मोजून घेतल्यानंतर पुरावा म्हणून मुलानी यांनी मागणी केली असता, त्यांनी केवळ 10 रुपयांच्या नोटेवर सही करून तीच व्यवहाराचा पुरावा असल्याचे सांगितले. तसेच एक हस्तलिखित पावतीही दिली.

काही वेळातच आरोपी तेथून पसार झाले. बराच वेळ आरोपींशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे मोहोसिन मुलानी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने एल.टी. मार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

सहा जणांविरुद्ध गुन्हा, तपास सुरू

तक्रारीच्या आधारे एल.टी. मार्ग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एल.टी. मार्ग पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्…; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक किती रकमेची झाली?

    Ans: तब्बल 1 कोटी रुपयांची.

  • Que: आरोपींनी कोणते आमिष दाखवले होते?

    Ans: एका महिन्यात 50 टक्के परतावा देण्याचे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: एल.टी. मार्ग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Mumbai news 50 return in one month lost a whopping 1 crore due to this single lure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा
1

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
3

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.