
Mumbai Nurse Suicide Case: पती डॉक्टर, पत्नी नर्स अन् संसारात तिसरीची एन्ट्री! मुंबईतील खळबळजनक प्रकरण उघड...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहिता मध्य मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात नर्स (परिचारिका) म्हणून कार्यरत होती, तर तिचा पती याच रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता. दोघेही एकाच ठिकाणी असल्याने सुरुवातीला त्यांचा संसार अगदी सुरळीत चालला होता. मात्र, काही काळापूर्वी पतीच्या आयुष्यात दुसऱ्या एका महिलेची एन्ट्री झाली.
पतीचे या महिलेसोबत अनैतिक संबंध जुळल्याने पती-पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागले. पतीने प्रेयसीसाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून त्या ३६ वर्षीय नर्सने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, तिने आत्महत्या केल्यानंतर पतीने येण्याचे टाळले. या घटनेमुळे मुलीच्या वडिलांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
ही आत्महत्येची घटना २ एप्रिल रोजी, म्हणजेच काही महिन्यांपूर्वी घडली होती. मुलीच्या अकाली मृत्यूमुळे नैराश्यात गेलेले वडील आणि कुटुंबीय मोठ्या धक्क्यात होते. मात्र, या धक्क्यातून कसेबसे सावरत त्यांनी कायदेशीर लढा देण्याचे ठरवले. मृत्यूपूर्वी तरुणीने एक ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती, ज्यामध्ये पतीने प्रेयसीसाठी केलेला छळ आणि त्याला सासूची मिळालेली साथ या सर्व गोष्टींचा सविस्तर उल्लेख होता.
अखेर ३० ऑक्टोबरला या ३६ वर्षीय महिलेच्या वडिलांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात जात रीतसर फिर्याद दिली. सुसाईड नोटमधील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर पती, त्याची कथित प्रेयसी आणि महिलेच्या सासूविरुद्ध आत्महत्येेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या चुनाभट्टी पोलीस या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
Ans: ही घटना मध्य मुंबईत घडली असून, ३६ वर्षीय महिला एका प्रख्यात रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती.
Ans: पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या संबधांमुळे आणि प्रेयसीसाठी त्याने केलेल्या मानसिक-शारीरिक छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली.
Ans: मृत महिलेच्या वडिलांनी ३० ऑक्टोबरला दिलेल्या तक्रारीवरून आणि सुसाईड नोटच्या आधारे चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.