File Photo : Baba Siddique
मुंबई : मुबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात विशेष मकोका कोर्टात 4590 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात 210 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, 26 अटकेत आरोपींसह 3 आरोपींना वाँटेड घोषित केले आहे. वाँटेड आरोपींमध्ये जिशान अख्तर, शुभम लोनकर, आणि अनमोल बिश्नोई यांचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांच्या चौकशीनुसार, या हत्येमागील तीन प्रमुख कारणे असू शकतात:
पोलिसांनी शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टचा आधार घेत या कारणांची पुष्टी केली आहे.
Breaking : मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या; नेमकं काय प्रकरण?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला. शुभम लोनकर महाराष्ट्र नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून हा पोस्ट शेअर करण्यात आला होता. पोलिसांनी लोणकरचा तपास सुरू केला, मात्र तो गाव सोडून गेला असल्याचे समजले. अकोट शहर पोलिस स्टेशनने 16 जानेवारी 2024 रोजी शुभम लोनकर, प्रवीण लोणकर आणि अकोट तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आणखी आठ जणांवर आर्म्स ऍक्टखाली गुन्हा दाखल केला होता.
अनमोल आणि अख्तर यांच्यासह लोणकरलाही खून प्रकरणात वॉण्टेड गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. गुन्ह्याची योजना आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे. मात्र, या आरोपपत्रात थेट लॉरेन्स बिश्नोईचे नाव नाही आणि वॉन्टेड संशयित म्हणून त्याचे नावही दिलेले नाही. त्याचा या प्रकरणाशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचेही बोलले जात आहे.
12 ऑक्टोबर 2024 रोजी माजी राज्य मंत्री जियाउद्दीन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांची निर्मल नगर, वांद्रे येथील पोलिस स्टेशनजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर निर्मल नगर पोलिस स्टेशनमध्ये जी.आर.नं. 589/2024 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला होता. आता मुंबई पोलिसांनी आपले तपास पूर्ण करून विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र सादर केले आहे.
सहाव्या पिढीचे रहस्यमय फायटर जेट ‘J-36’ बनेल चिनी ड्रोन आर्मीचा कमांडर
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच MCOCA महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये लागू केला. राज्यातून संघटित गुन्हेगारी रोखणे हा त्याचा उद्देश आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींवरही मकोका लावण्यात आला आहे. हा कायदा दिल्लीतही लागू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2002 मध्ये राष्ट्रीय राजधानीत याची अंमलबजावणी केली होती.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानला संदेश पाठवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि इतर दोन व्यक्ती शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांचा समावेश आहे.