सुनेत्रा पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष (फोटो- सोशल मीडिया)
सुनेत्रा पवार असणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष
प्रफुल्ल पटेल यांनी केली मोठी घोषणा
आज पार पडली पक्षाची राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक
Ncp Party: आज राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची (NCP) राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची कमान आता पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'राष्ट्रीय अधिवेशन २०२६' चे थेट प्रक्षेपण. 📍वरळी, मुंबई https://t.co/12ikRmcVmM — MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 26, 2026
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्याला पक्षातील सर्वांनी सहमती दर्शवली. तसेच पार्थ पवार यांच्याकडे देखील मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष केले. त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला होता. पक्ष म्हणून अनही राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी काम केले, असे पटेल म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे…






