दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने गॅरेजचालकाला दूर नेलं PhonePe वरून 'असं' लुबाडलं
नवी मुंबई येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष देत पीडित महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ५५ वर्षीय सिराज इद्रीस चौधरी याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडित महिलेला दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे अमिश देत तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी इद्रिस चौधरी याच्यावर या आधी देखील गुना दाखल करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
धक्कादायक! १० वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; खून का नरबळी?
नराधम आरोपीने पीडित महिलेला दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देतो असे आमिष दिले. काही दिवसांनी नोकरी मिळेल असं अमिश दाखवत त्याने या पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. १७ जून ला पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान महिलेला या त्रासाला सामोरे जावे लागले असे वाशी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने याबाबत वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इद्रीस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी दिली आहे.
दरम्यान, उरण तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण तालुक्यातील JNPT बंदरातून देशात बेकायदेशीर सिगारेटचा मारा करणाऱ्यांच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल 13.18 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेटचा साठा डीआरआयने उधळून लावत, एकाला अटक केली आहे. भारतात विक्रीस बंदी असलेली ही सिगारेट समुद्रमार्गे चोरट्या पद्धतीने देशात आणली जात होती. कस्टम ड्युटीला डोक्यावर घेऊन देशाच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या टोळीच्या डावावर डीआरआयने थेट घाव घातला आहे.
DRI मुंबई युनिटला मिळालेल्या खाजगी माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या एका कंटेनरमध्ये ‘कोटेड कॅल्शियम कार्बोनेट’ असे खोटे भासवून चक्क 1014 कार्टून परदेशी सिगारेट देशात घुसवण्याचा डाव होता. परंतु, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हा खेळ पुरता हाणून पाडत, कंटेनरमधून 1 कोटी 1 लाख 40 हजार सिगारेट जप्त केल्या. यावर कुठलाही वैधानिक इशारा नसल्याने या सिगारेट पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात.
पाच लाखांसाठी विवाहितेला दिलं पेटवून; कोर्टाने पतीसह सासरच्या मंडळींना ठोठावली ‘ही’ शिक्षा