Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

Murder Case : ठाण्यातील मुंब्रा येथून धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे. प्रियकराचा काटा काढण्यासाठी पती आणि भावाच्या मदतीने प्रियसीनेच रचला हत्येचा कट. पोलिसांनी मृतदेह हिरव्या ड्रमात आढळला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 09:38 AM
Mumbra News : 'ड्रम कांड'ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

Mumbra News : 'ड्रम कांड'ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

Follow Us
Follow Us:
  • मुंब्रात प्रेयसीने रचला प्रियकराच्या खुनाचा डाव.
  • हिरव्या ड्रमात आढळला प्रियकराचा मृतदेह.
  • मास्टरप्लॅन उघड होताच परिसरात खळबळ.
ब्लू ड्रम कांडची पुनरावृत्ती ठाण्याच्या मुंब्रा येथे घडून आल्याची माहिती समोर येत आहे. निळ्या ड्रम प्रकरणात महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन त्याचा मृतदेह निळ्या ड्रमात कोंबून भरला होता. तर या प्रकरणात मात्र गोष्ट काहीशी वेगळी घडली आहे. माहितीनुसार, या प्रकरणात महिलेने पतीचा नाही तर प्रियकराचा काटा काढला आहे. तिने पती आणि भावाला हाताशी घेऊन या हत्येला पूर्णत्वास आणले. मृताचे शरीर पोलिसांनी हिरव्या ड्रमातून बाहेर काढले ज्यानंतर पुन्हा एकदा राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 वर्षीय चिमुकलीवर स्कूल केअरटेकरकडून बलात्कार, आरोपी जामीनावर बाहेर

प्रियकर होता बेपत्ता

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंब्रामध्ये राहणारा अरबाज मकसूद अली खान ३ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होता. दादरमध्ये कामासाठी जात आहे असे सांगून तो घरातून निघाला होता पण त्या रात्री तो घरी परतलाच नाही. बरीच चाैकशी केल्यानंतरही जेव्हा कुटुंबाला त्याची माहिती मिळाली नाही तेव्हा त्यांनी पोलिस ठाण्यात त्याची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. प्रकऱणात खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पोलिसांनी शोधकार्याला सुरुवात केली. पोलिसांनी अरबाजचे मोबाईलक काॅल डिटेल्स आणि लोकोशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात हे उघड झाले की, त्याचे शेवटचे लोकेशन वर्सोवाच्या एका ठिकाणी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची प्रेयसी मेहजबीन शेख देखील त्याच परिसरात आढळली.

प्रेयसी मेहजबीनवर संशयाच्या जोरावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. सुरुवातीला ती पोलिसांची दिशाभूल करु पाहत होती पण पोलिसांनी सक्तीने चाैकशी करताच तिने सर्व सत्य उघड केले ज्यात धक्कादायक खुलासे झाले. चाैकशीदरम्यान मेहजबीनने आपला गुन्हा कबूल करत सांगितले की, पती हसन आणि भाऊ तारिक शेख यांनी अरबाजकडून पैसे उकळण्याचा आणि त्याची हत्या करण्याचा कट रचला होता.

आपला मास्टरप्लॅन उघड करत तिने सांगितले की, त्यांनी अरबाजला बहाणा करुन वर्सोवा इथे बोलावून घेतले. त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली पण जेव्हा अरबाजने हे पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी त्याचे हात बांधून, प्लास्टिकाच्या पाईपने त्याला बेदम मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर, आरोपींनी एका हिरव्या ड्रमात त्याचा मृतदेह भरुन मुब्रा येथील एका निर्जन नाल्यात त्याला फेकून टाकले.

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी

दरम्यान पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रेयसी मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महिलेचा पती हसन आणि त्यांचा अन्य साथी मुजम्मल पठान फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध खून, गुन्हेगारी कट आणि पुरावा नष्ट करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही दिवसांतच ही मर्डर मिस्ट्री सोडवली ज्यामुळे आरोपींना लवकर पकडता आले.

 

Web Title: Mumbra green drum murder case girlfriend killed boyfriend with husband and brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Thane Crime

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.