
एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या
नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. भांडणानंतर मैत्रिणीच्या प्रियकराने त्याच्यावर चाकूने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. ही थरारक घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत गाडीखाना परिसरात घडली. अमन मेश्राम (वय २४, रा. गंगाबाई घाट चौक) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
अमित रामराव शिवरकर (रा. बाभूळगाव, यवतमाळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमनची गाडीखाना परिसरात राहणाऱ्या तरुणीशी मैत्री होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, तरुणी त्याला भाव देत नव्हती. आरोपी अमित हा हिंगणाच्या गुमगाव परिसरातील एका ढाब्यावर काम करतो. तेथेच काम करणाऱ्या हेमंतशी त्याची मैत्री होती. हेमंतची प्रेयसी अमनच्या मैत्रिणीची मैत्रीण आहे. त्यामुळे अमितसोबतही तिची चांगली मैत्री झाली होती. अमनला याबाबत समजले आणि त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. तो दोघांच्या भेटीगाठीमुळे नाराज होता.
हेदेखील वाचा : Dharashiv Crime: तुळजापूर तालुक्यात भर चौकात कुऱ्हाडीने तरुणावर वार, जागीच झाला मृत्यू, काय घडलं नेमकं?
दरम्यान, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याने चिडून तरुणीला फोन केला. तिला अमितसोबत गाडीखाना परिसरात भेटायला बोलावले. राम कूलरजवळील मैदानात सर्व बोलत उभे होते. यादरम्यान अमनने चार ते पाच वेळा तरुणीच्या कानशिलात लगावल्या. यामुळे अमित चिडला. त्याने चाकू काढून अमनच्या पोटात भोसकला.
अमनला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पसार
अमनला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून अमित पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले. अमनला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
कुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून मौजे केशेगाव येथून एक धक्कदायक घटना नुकतीच समोर आली. चौकात कुऱ्हाडीने हल्ला करून एका व्यक्तीची गावातील तरुणानेच सगळ्यांसमोर निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे केशेगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सकाळच्या साडे नऊच्या सुमारास शनिवारी घडली. त्यानंतर आता नागपुरात हत्या प्रकरण समोर आले आहे.
हेदेखील वाचा : Akola Murder : अकोल्यात धक्कादायक घटना! पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या, ‘या’ कारणामुळे घडला थरार…