Pune Crime News: दौंडमध्ये मध्यरात्री दुहेरी दरोडा! लाखोंचा ऐवज लंपास, संपूर्ण घटना CCTV कैद
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार,मृतकाचे नाव सिद्धाराम पंडित दहिटणे (वय 35, रा. केशेगाव ता. तुळजापूर) असे आहे तर आरोपीचे नाव निखिल सोमनाथ कांबळे (वय 25, रा. केशेगाव) असे आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला काही तासातच ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी सिद्धाराम दहिटणे हा केशेगाव येथील चावडी चौकातील एका हॉटेलजवळ खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होते. दरम्यान, आरोपी निखिल कांबळे हा मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आला आणि हातातील कुऱ्हाड घेऊन मागून अचानक सिद्धाराम यांच्यावर हल्ला चढविला.
जागीच मृत्यू
निखिलने त्यांच्या मानेवर व शरीरावर सलग सात ते आठ कुऱ्हाडीचे वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या जबर हल्ल्यात सिद्धाराम दहिटणे हे जागीच मृत्यूमुखी पडले. आरोपी हल्ला करून लगेच मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांची तात्काळ कारवाई
या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाणे तसेच इटकळ आऊट पोस्टचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. आरोपी निखिल हा पळून जात होता. तेव्हा पोलिसांनी काही अंतरावरूनच ताब्यात घेतले, सध्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई सुरु आहे.
का करण्यात आली हत्या?
या घटनेमागे गावातील मागील भांडणातील वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. फुटेजमधील दृश्य अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक असल्याचे सांगितले जात आहे.
पूर्वीचा वाद कारणीभूत?
या घटनेमागे गावातील मागील भांडणातील वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. फुटेजमधील दृश्यं अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक असल्याचे सांगितले जात आहे.






