Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने पत्नी आणि दोन मुलींची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 10:27 AM
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

Follow Us
Follow Us:
  • म्हैसूरमध्ये एकाच घरात पती, पत्नी आणि दोन मुलींचे मृतदेह आढळले.
  • पत्नी व मुलींचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय; पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा.
  • घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त; आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचा उल्लेख.
कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातून हत्येचे नवीन धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. हुन्सूर शहरातील न्यू मारुती लेआउट परिसरातील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने कथितरित्या आपली पत्नी आणि दोन मुलींचा खून केला आहे. मुख्य या तिहेरी हत्येनंतर त्याने स्वत: गळफास घेत आपले आयुष्य संपवले. माहिती मिळताच पोलिस घटनेस्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहांना आपल्या ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात समोर आले की, पत्नी आणि दोन मुलींचे तोंड चिकटपट्टीने बांधण्यात आले होते. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक सुसाईड नोट देखील आपल्या ताब्यात घेतले आहे ज्यात संपत्ती, कर्ज आणि अन्य वैयक्तिक गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या.

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

घरात चार जणांचा मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना म्हैसूर जिल्ह्यातील हुंसर शहरातील न्यू मारुती लेआउट परिसरात घडून आली. मृतांची ओळख ४९ वर्षीय हरीश, त्याची पत्नी निशिता (३६), १४ वर्षीय मुलगी नेक्सा आणि ८ वर्षीय मुलगी रक्षा अशी पटली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी पोहचले. इथे त्यांना पहिल्या मजल्यावरील खोलीत हरीश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याचबरोबर त्याची पत्नी आणि दोन्ही मुली या तळमजल्यावरील एका बेडरुममध्ये बेडवर मृतावस्थेत आढळल्या.

गुदमरुन मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, पत्नी आणि दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावर चिकटपट्टी लावण्यात आली होती. प्राथमिक तपासानुसार, तीघींचा मृत्यू गुदमरुन झाला आहे. तथापि, मृत्यूचे खरे कारण मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलिस सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

सुसाईड नोट

घटनास्थळी पोलिसांनी मृतदेहासोबतच एक सुसाईड नोट देखील जप्त केले आहे. यात सुरुवातीला लिहिले होते की, “मी वरच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळेल,” यात व्यावसायिकाने अनेक गोष्टी लिहल्या होत्या. चिठ्ठीचे शीर्षक “माझ्या अखेरच्या इच्छा” असे ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या चिठ्ठीमध्ये मालमत्ता, कागदपत्रे, लाॅकरची माहिती, चाव्यांचे ठिकाण आणि विशिष्ट व्यक्तींच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्यासंबंधीच्या सूचना नमूद करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या एका नोटमध्ये कर्ज आणि आर्थिक बाबींचीही माहिती देण्यात आली होती. सध्या पोलिस पोस्टमार्टम रिपोर्ट आणि हाती लागलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारावर मृत्यूचे खरे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Web Title: Mysuru family murder real estate businessman kills wife two daughters dies by suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Attempt to Suicide
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
1

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
2

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले
3

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…
4

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.