Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन

नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या कोठडीत पोस्को गुन्ह्यातील आरोपी नरेंद्र भाटिया याने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्रपाळीतील निष्काळजीपणामुळे पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 24, 2026 | 08:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पोस्को आरोपी नरेंद्र भाटियाची पोलीस कोठडीत आत्महत्या
  • रात्रपाळी ड्युटीवर असतानाही घटना घडल्याने गंभीर बाब
  • पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
नागपूर: नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीत एका आरोपीने गुरुवारी आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नरेंद्र भाटिया असे आहे. त्याला अथारण्यसाठी दिलेल्या चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी चारही पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्र पाळी ड्युटीवर हजर होते. या प्रकरणी एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल आहे.

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नरेंद्र भाटिया असे आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी पोस्कोच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत असतांना त्याने रात्री आत्महत्या केली. रात्री झोपायला पांघरण्यासाठी दिलेली चादर फाडून गळफास तयार करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल

यानंतर सकाळी पहाटे पोलिसांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देत माहिती घेतली. तर दुसरीकडे आरोपीच्या कुटुंबीयांनीही यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. यावरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत आता एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे

पोलीस उपनिरीक्षक नितीन आत्राम (नाईट ड्युटी अधिकारी) आणि अभय खडसे (ठाणा हजेरी गार्ड इन्चार्ज तसेच लॉकअप गार्ड इन्चार्ज), प्रमोद दूधकवरे (लॉकअप गार्ड ड्युटी), राहुल चव्हाण (लॉकअप गार्ड ड्युटी) असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मानकापूरमध्ये धक्कादायक प्रकार: शेजाऱ्याने तरुणीचा गळा दाबून खून, आत्महत्येचा बनाव उघडकीस

मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या विवाहित पुरुषाने तरुणीची हत्या केली. आरोपीने आधी तरुणीचा गळा दाबून खून केला आणि नंतर फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला. प्राची हेमराज खापेकर (२३, रा. राजलक्ष्मी सोसायटी, गोधनी रोड) असे मृताचे तर शेखर ढोरे (३८) असे शेजारी राहणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्राचीची आई रुक्मिणी खापेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले.

काही महिन्यांपासून शेखर प्राचीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले होते.कुटुंबीयांनी प्राचीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. प्राचीनेही बोलणे बंद केल्याने शेखर संतापला होता. सोमवारी सकाळी घरी कुणी नाही हे बघून शेखर तिच्या घरात शिरला. बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्राचीने नकार दिला. यावरून शेखर संतापला आणि त्याने प्राचीचे डोके जमिनीवर आपटले आणि गळा दाबून खून केला.

KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या कोठे झाली?

    Ans: नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या कोठडीत.

  • Que: आरोपी कोणत्या गुन्ह्यात अटक होता?

    Ans: तो पोस्को (POCSO) गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी होता.

  • Que: पोलिसांवर काय कारवाई झाली?

    Ans: चौकशीनंतर एका उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

Web Title: Nagpur crime an accused committed suicide in police custody in nagpur a police sub inspector and 3 other personnel have been suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल
1

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल

ठाण्यामध्ये आठ लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
2

ठाण्यामध्ये आठ लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Crime : मसाज बुकिंग रद्द केल्याने थेरपिस्टने महिलेची मारहाण, अर्बन कंपनीचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद
3

Mumbai Crime : मसाज बुकिंग रद्द केल्याने थेरपिस्टने महिलेची मारहाण, अर्बन कंपनीचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक
4

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.