
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
शेख अकीन हा आपल्या मित्र मोहम्मद सिराजसोबत ‘हायवे बार अँड रेस्टॉरंट’ येथे जेवणकरण्यासाठी गेला होता. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही आरोपींनी त्यांना जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरण्यास सांगितले. शेख अकीन आणि त्यांच्या मित्राने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद चिघळला. त्यानंतर आरोपींनी आपल्या इतर साथीदारांना बोलावून दोघांवर चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली.
सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू
६आरोपींना अटक
पोलिसांनी या घटनेची तात्काळ कारवाई केली असून ६ आरोपींना अटक केली आहे. तर २ आरोपींचा शोध सुरु आहे. अजहर, हुसैन उर्फ अरमान लोचा, राजा हिरोती, फरहान उर्फ फर्रा, पिंटू आणि इरफान शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कपिलनगर पोलिसांनी आरोपींवर हत्या करण्याचा प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात जखमी शेख अकीन आणि त्यांच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने नागपुरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये भररस्त्यात उघडपणे मारहाण होत असल्याचे दिसत आहे.
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल
नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाणे परिसरात हुंड्याच्या छळाला कंटाळून एका महिलेने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेने पोलिसांनी मृत महिलेच्या सासरच्या चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित मृत महिलेची ओळख सना अंजुम अकील खान (वय 26) अशी आहे. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेलं आहे.
Parbhani Crime: परभणीत खळबळ! झाडाला लटकलेल्या अवस्थेत महिला-पुरुषाचे मृतदेह; आत्महत्या की घातपात?
Ans: नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: सिगारेटच्या बिलावरून झालेला किरकोळ वाद.
Ans: 6 आरोपींना अटक केली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे.