Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपूर हादरलं! बेपत्ता 14 वर्षीय मुलाचा पोत्यात बांधलेला मृतदेह सापडला; नरबळी की हत्या? तपास सुरू

नागपूरमध्ये हनुमान जयंतीत बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्वचा मृतदेह दोन दिवसांनी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला. शरीरावर जखमा असून हत्या की नरबळी याचा तपास पोलीस करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 08:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बेपत्ता मुलाचा दोन दिवसांनी मृतदेह सापडला
  • पोत्यात हातपाय बांधलेले, शरीरावर गंभीर जखमा
  • हत्या की नरबळी? पोलिसांचा तपास सुरू
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेतून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. मात्र आता दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव अथर्व दिलीप नैनोरे असे आहे. तो नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातून गुरुवारी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह ४ मार्च रोजी नागपूरपासून कित्येक किलोमीटर दूर कळमेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत आढळून आला.

Dharashiv News : येरमाळा यात्रेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तिघांना अटक; 1.31 लाखांचा मुद्देमाल जप्त

काय घडलं नेमकं?

गुरुवारी नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातून अथर्व नैनोरे हा १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत तो शेवटचा दिसला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र आता दोन दिवसानंतर शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी कळमेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत आढळून आला आहे.

अतिशय वाईट अवस्थेत सापडला मृतदेह

अथर्वचा मृतदेह एका पोत्यात आढळून आला. त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते, त्याचे डोळे, जीभ आणि चेहरा अत्यंत विकृत अवस्थेत होते. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक घाव होते. त्याचा मृतदेह पाहून पोलीस देखील आश्चर्य व्यक्त करत होते. अथर्वचा मृतदेह ज्या पोत्यात सापडला त्या पोत्यांवरील ट्रेड मार्कवरुन आणि बॅच क्रमांक वरून आरोपीचा शोध घेत आहेत.

आम्ही त्याला घरी चलण्यास सांगितले परंतू…

शोभायात्रा मार्गावरील एका नर्सिग होम जवळील एका आईसक्रीम पार्लरच्या सीसीटीव्हीत अथर्व दोन मित्रांसोबत जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या दोन मित्रांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी “आम्ही त्याला घरी चलण्यास सांगितले परंतू त्याने नकार दिला,” असे उत्तर दिले.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. त्याची हत्या कोणी केली? का केली? अशे अनेक प्रश्न पोलिसांनी उपस्थित केले आहेत. जर अथर्वचे अपहरण करून हत्या करण्यात आली असेल तर मारेकरी त्याच्या ओळखीचे असू शकता. आरोपींना त्या भागाची इथ्थंभूत कल्पना असावी असे पोलिसांना वाटते. आरोपी हे मुख्य मार्गावरील CCTV मध्ये दिसू नये या पद्धतीने त्याला सीसीटीव्ही नसलेल्या गल्लीबोळ्यातून नेले असा पोलिसांना संशय आहे.

नरबळी की हत्या?

हत्या पैश्यांच्या वादातून झाली असावी, अशी दाट शंका पोलीस व्यक्त करत आहे. मात्र पौर्णिमेच्या दिवशी ही हत्या झाली असेल तर हत्येमागे नरबळीसारखे कारण असू शकते अशी देखील शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व पैलूने तपास करत आहे. या घटनेने अथर्वच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Dharashiv News: खाजगी शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलगा कधी बेपत्ता झाला होता?

    Ans: हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेदरम्यान.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: कळमेश्वर परिसरातील रिंगरोडलगत.

  • Que: पोलिस कोणत्या दिशेने तपास करत आहेत?

    Ans: हत्या, ओळखीचे लोक आणि नरबळी या सर्व शक्यतांवर तपास सुरू आहे.

Web Title: Nagpur crime nagpur shaken body of missing 14 year old boy found tied inside a sack human sacrifice or murder investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…
4

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.