चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने केली महिलेची हत्या; रॉडने सपासप वार केले अन्...
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भांडेवाडी परिसरात काल रात्री एका तरुणाची धारधार शास्त्राने हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सतीश मेश्राम (३१ वर्ष ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो बांधकाम साईटवर काम करायचा. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. दोन दिवसांपूर्वी कामावर गेलेला सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला होता. कुटुंबीयांनी त्याची मिसिंग असल्याची तक्रार पारडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. काल रात्री (शुक्रवारी) भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरु असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना सतीशच्या मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सतीशची हत्या धारधार शास्त्राने करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Bhandara Crime: भंडारा हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार..
मिळालेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) रात्री भांडेवाडी परिसरात सतीश मेश्राम (31 वय वर्ष) या तरुणाची हत्या करण्यात आली. सतीश गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू होता. त्याचा शोध सुरु असतांना त्याचा मृतदेह आढळला. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सतीश बांधकामाचं काम करायचा. गुरुवारी सकाळी तो कामावर गेला होता. मात्र तो घरी आलाच नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पार्डी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार केली.
पोलीस त्याचा शोध घेत असतानाच शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्मजवळ एका नागरिकाला सतीशचा मृतदेह आढळला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पारडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सतीशच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार झाल्याचे दिसून आले. सतीशजवळ पोलिसांना एक मोबाइल सापडला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तो मोबाइल एका लग्नातून चोरीला गेल्याची बाब समोर आली. पोलिसांनी रात्री उशिरा तीन संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे. सतीशचा कुणाशी वाद होता का व त्यातून हा प्रकार झाला आहे का याचा तपासदेखील पोलीस करत आहेत.
मित्राच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर; जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू