crime(फोटो सौजन्य - pinterest)
राज्यात सतत हत्या, अत्याचार, लैंगिक शोषणच्या घटना समोर येत आहे. या घटनांमुळेराज्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. आता भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. चॉकलेटचं आमिष देऊन दोन चिमुकलींवर एकानं लैंगिक अत्याचार केला आहे. हि घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Karad Accident News : दोन दुचाकींची जोराची धडक; अपघातात डॉक्टरचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अत्याचार करणारा नराधम हा अतुल बुराडे ३६ वर्षीय असून तो घराशेजारी राहत होता. त्याने चॉकलेटचा अमिश देऊन दोन ८ व ९ वर्षाच्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अतुलने अनेक दिवस चॉकलेटचं आमिष दाखवत हा संतापजनक प्रकार केला असल्याचं समोर आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
आरोपीला अटक
चॉकलेटचं आमिष दाखवत दोन चिमुकल्यांवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी करडी पोलिसांनी अतुल बुराडे (३६) या आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढरी या गावातील ही घटना असून आरोपी अतुल बुराडे याच्या घराशेजारी राहणाऱ्या 8 आणि 9 वर्षीय चिमुकलींसोबत मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सावत्र बापानेच केला अत्याचार..
एका १५ वर्षीय मुलीवर सावत्र बापानेच बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 64 (2)(एफ), 65 (1) भारतीय न्याय संहिता सह कलम 4, 6 पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केली आहे. १५ वर्षीय मुलगी घरात झोपून होती त्यावेळेस ही घटना घडल्याचे समोर आले आहे. हि घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात घडली. विशेष म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात ही घटना घडली असून आज समोर आल्याने गावातही खळबळ उडाली आहे याप्रकणी, आरोपी बापाविरुद्ध मुलीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.