काय घडलं नेमकं?
आरोपीचं नाव पांडुरंग कोंडामंगले (३२) असे आहे. तो मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे हेअर कटिंगचे दुकान आहे. त्याला तीन मुलं आहेत. तीन दिवसांपूर्वी पांडुरंग याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरी एकटाच परत आला.
Gadchiroli News: गडचिरोलीत काळजाला चटका! 10 वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या
दुसरीकडे कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यांना चौकशीत पांडुरंगवर संशय बळावला. त्यांनतर या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी पांडुरंगला अटक केली. यांनतर गावात चर्चेला उधाण आले. यानंतर गावात खळबळ उडाली.
गावात चर्चा काय?
आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलले जात आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. मात्र त्याला तीन मुले असल्याने निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरू नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. महाराष्ट्रात तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे त्याने हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास करत आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. आता काय पोलीस तपासात समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
Latur Crime: लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हाणामारी; तरुणावर धारधार शास्त्राने केली हत्या
Ans: तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरातील कॅनॉलमध्ये.
Ans: नाही, नेमके कारण अद्याप तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
Ans: सरपंचपदासाठी तीन अपत्यांचा नियम अडसर ठरू नये म्हणून.






