Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: पत्नीला शेवटचं लोकेशन पाठवलं… आणि आंब्याच्या झाडाला घेतला गळफास; नागपूरच्या इंजिनिअरची धक्कादायक आत्महत्या

नागपूरमधील कोराडी थर्मल पॉवर प्लांटमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत 39 वर्षीय इंजिनिअर राम विनोद चौधरी यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी व नातेवाईकांना लोकेशन पाठवले होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 02:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 39 वर्षीय वरिष्ठ इंजिनिअर राम विनोद चौधरी यांनी गुरुकुंज मोझरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी आणि नातेवाईकांना आपले लोकेशन पाठवले होते.
  • पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मोबाईल जप्त केला असून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय इंजिनिअरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव राम विनोद चौधरी असे आहे. ते नागपूरमध्ये कोरडी थर्मल पॉवर प्लेटमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. चौधरी हे रविवारी सकाळी स्वतःच्या हुंडई कारने नागपूरहून अमरावतीच्या दिशेने आले. गुरुकुंज मोझरी बायपासलगत राष्ट्रसंत पेट्रोलियमजवळ कार उभी करून त्यांनी जवळील शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना सकाळी आठच्या सुमारास निर्दशनास आली. याची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पोसिमरतांसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Kolhapur News: एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची लगबग सुरू… अन् विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; माहेरच्यांनी केले गंभीर आरोप

आत्महत्येपूर्वी पाठवले लोकेशन

आत्महत्येपूर्वी चौधरी यांनी पत्नीसह काही नातेवाईकांनी गुरुकुंज मोझरी परिसरातील त्यांचं लोकेशन पाठवलं होतं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला असून त्यातील माहितीची तपासणी सुरू आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास करत आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून कुटुंबीय, नातेवाईक तसंच संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

17 वर्षीय सावत्र मुलावर लैंगिक संबंधांसाठी दबाव; नकार दिल्यावर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय सावत्र मुलाला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आणि नकार दिल्यास खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील पीडित युवक बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. तो सावत्र आईसोबत राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या सख्ख्या आईचे निधन झाले होते. त्यांनतर वडिलांनी दुसरा विवाह केला. काही महिन्यातच वडिलांचे देखील निधन झाल्याने नातेवाईकांनी त्याची जबाबदारी सावत्र आईकडे सोपविली होती. मात्र सावत्र आईने पीडित तरूणाशी अश्लील वर्तन करू लागली. त्याच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागली. तरुण वारंवार या सगळ्याला नकार देत राहिला. मात्र तिने याच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर ती त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. नकार दिल्यास खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकीही तिने त्याला दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लाच घेणारा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; चहाच्या टपरीवर सापळा रचून रंगेहात पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: राम विनोद चौधरी.

  • Que: आत्महत्येपूर्वी त्यांनी काय केले होते?

    Ans: पत्नी आणि नातेवाईकांना आपले लोकेशन पाठवले होते.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अकस्मात मृत्यूची नोंद करून मोबाईल जप्त केला असून आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Web Title: Nagpur crime sent last location to wife then hanged himself from a mango tree shocking suicide by nagpur engineer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
1

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
2

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
3

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
4

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.