Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

नालासोपारा पूर्व, महेश पार्क येथील शिवम निवास इमारतीत ३० वर्षीय हिरेन चित्तौडा या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 09, 2026 | 09:32 PM
नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Follow Us
Follow Us:

  • नालासोपाऱ्यात खळबळ!
  • बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
  • दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड
Dead Body Found in Nalasopara: नालासोपारा पूर्वेतील महेश पार्क परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिरेन महेंद्र चित्तौडा असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

दुर्गंधीमुळे फुटला घटनेला वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील महेश पार्क परिसरातील ‘शिवम निवास’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३०९ मध्ये हिरेन चित्तौडा राहत होता. आज दुपारच्या सुमारास या बंद खोलीतून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने इमारतीमधील रहिवाशांना संशय आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती हिरेनची बहीण आणि स्थानिक समाजसेवक स्वप्निल बांदेकर यांना दिली. समाजसेवक आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी तातडीने तुलिंज पोलिसांना पाचारण केले.

दरवाजा तोडताच दिसले भीषण दृश्य

पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश करताच पोलिसांनाही धक्का बसला; हिरेनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला होता. मृतदेहाची अवस्था पाहता, त्याचा मृत्यू काही तासांपूर्वी किंवा दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

आई गावी गेली अन् काळ आला…

हिरेन चित्तौडा हा आपल्या आईसोबत या घरात राहत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याची आई गुजरातमधील आपल्या मूळ गावी गेली होती. त्यामुळे हिरेन घरात एकटाच होता. मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन गेल्या काही दिवसांपासून आजारी होता, तसेच त्याला नशेचे व्यसन असल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे त्याच्या मृत्यूमागे आजारपण आहे की अन्य काही कारण, याचा पोलीस शोध घेत आहेत.

तुलिंज पोलिसांकडून तपास सुरू

सध्या तुलिंज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हिरेनचा मृत्यू कशामुळे झाला? हे केवळ शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Cyber Crime: मुंबईत हाय-प्रोफाईल फसवणूक; शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६६ लाख लुटले

Web Title: Nalasopara youth dead body found tulinj police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • crime news
  • Nalasopara

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.