नालासोपाऱ्यात गॅस सिलेंडर टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. एकीकडे सरकार गॅस तुटवडा नसल्याचा दावा करतंय तर दुसरीकडे हॉटेल चालकांना वेळेवर सिलेंडर मिळत नाहीत.
Nalasopara पूर्वेतील धानिवबाग परिसरातून बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय झोया खान हिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला. अपहरणाचा गुन्हा दाखल असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
नालासोपारा पूर्वेतील टाकी रोडवरील सर्वोदय वसाहतीत पहाटे भांडणातून भावाने कोयत्याने बहिणीची हत्या केली. मध्ये पडलेल्या आईवरही हल्ला झाला. आई जखमी; आरोपी भाऊ अटकेत. वसई-विरारमधील आठवड्यातील चौथी हत्या.
नालासोपारा येथे पूर्ववैमनस्यातून 31 वर्षीय शुभम मिश्रा याची चाकू व दगडाने निर्घृण हत्या झाली. सिगारेटच्या बहाण्याने पंचमुखी हनुमान मंदिराजवळ हल्ला झाला. नालासोपारा पोलीस गुन्हा दाखल; आरोपी फरार.
नालासोपारा रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून आज विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांना आता रांगेतूनच लोकलमध्ये चढावे लागणार आहे.
वसई पूर्वेतील वसंत नगरी मैदान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे भरलेल्या मेळ्यात नालासोपारा येथील एका अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
नालासोपारा पूर्वेकडेल जाबरपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यासंबधित प्रकरणी ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्व, महेश पार्क येथील शिवम निवास इमारतीत ३० वर्षीय हिरेन चित्तौडा या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या मार्गांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या रणधुमाळीत जनतेचे प्रश्न काय आहेत?
वसई विरार मध्ये रस्त्याची कामं जोमाने सुरू करण्यात आली आहेत. निवडणुका जवळ आल्याने रस्त्यांच्या कामांचे नारळ ठिकठिकाणी फोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
Combing operation in Nalasopara : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. याचदरम्यान आता नालासोपारा पोलीसांनी कोंबींग ऑपरेशन करण्यास सुरुवात केली आहे.