Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: “आई-बाबा खूप आठवण…” अशी पोस्ट केल्यानंतर अवघ्या दोन तासांत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड परिसरात बी.एस्सी. शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडिलांची ओढ व मानसिक अस्वस्थतेमुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 01, 2026 | 01:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • रानोजी विलास ऐनवलेवाड (20) असे मृत तरुणाचे नाव
  • आत्महत्येपूर्वी इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट
  • पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
नांदेड: नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यानंतर अवघ्या दोन तासात आत्महत्या केली. आई-वडिलांची तीव्र ओढ आणि मानसिक अस्वस्थता यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव रानोजी विलास ऐनवलेवाड (20) असे आहे.

Beed Crime: ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत

काय घडलं नेमकं?

रानोजी हा नांदेड येथील बी. एस्सी. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. राणोजीचे आई-वडील रोजगारासाठी तेलंगणा राज्यात गेली होती. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो गावी आला होता. बुधवारी सकाळी रानोजीने आपल्या भावाला नांदेडला परत जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा भावाने त्याला इस्लापूर येथे सोडले. मात्र, तो नांदेडला न जाता पुन्हा सहस्त्रकुंड परिसरात परतला. त्यानंतर दुपारच्या सुमारास सहस्त्रकुंड येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावून त्याने आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.

काय लिहिले होते पोस्टमध्ये

रानोजीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आई- वडिलांची आठवण व्यक्त करताना लिहिले होते, “आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. मी घरी आहे, पण तुम्ही इथे नाही. लवकर या… मी वाट बघतोय.” अशी पोस्ट शेअर केली. त्यानंतर सुमारे दोन तासात त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. आत्महत्या कारण्यामागेचे नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या जवळून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून तो मानसिक तणावात होता का, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेला तरुण कोण होता?

    Ans: रानोजी विलास ऐनवलेवाड (वय 20), बी.एस्सी. प्रथम वर्षाचा विद्यार्थी.

  • Que: आत्महत्येपूर्वी त्याने काही संकेत दिले होते का?

    Ans: होय, त्याने इंस्टाग्रामवर आई-वडिलांची आठवण व्यक्त करणारी भावनिक पोस्ट शेअर केली होती.

  • Que: आत्महत्येमागचे नेमके कारण काय?

    Ans: अद्याप स्पष्ट नाही; मात्र आई-वडिलांची ओढ आणि मानसिक तणाव कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Nanded crime after posting i miss my parents so much the young man took the extreme step within just two hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime: ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत
1

Beed Crime: ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा
2

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा

Ahilyanagar Crime: श्रीरामपूरमध्ये थरारक गोळीबार; बंटी जहागिरदारचा उपचारादरम्यान मृत्यू, शहरात तणाव
3

Ahilyanagar Crime: श्रीरामपूरमध्ये थरारक गोळीबार; बंटी जहागिरदारचा उपचारादरम्यान मृत्यू, शहरात तणाव

Jalgaon Crime: जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला, आरोपी नागरिकांच्या मदतीने ताब्यात
4

Jalgaon Crime: जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला, आरोपी नागरिकांच्या मदतीने ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.