Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातून १४ कुटुंबे माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी वास्तवास आली होती. ही कुटुंबे तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहत होती. २४ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलींचे आई-वडील व नातेवाईक शेतात ऊसतोडणीसाठी गेले होते. दरम्यान त्यावेळी दोन अल्पवयीन मुली झोपडीत एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत गावातीलच किराणा दुकानदार गणेश राजेभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र, ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार यांनी तिथे येत घृणास्पद कृत्य केले.
आरोपींनीं मुलींना जबरदस्तीने झोपडीतून ओढत बाहेर काढले. दुकानदार गणेश घाटूळ याने एका मुलीला उसाच्या शेतात नेले, तर ट्रॅक्टर चालक अशोक पवार याने दुसऱ्या मुलीला कपाशीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर त्यांनी मुलींना धमकी दिली. “ही गोष्ट कुणाला सांगितली तर ठार मारू,” अशी धमकी त्यांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी काही दिवस हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.
२८ डिसेंबरला हिंमत करून एका पीडित मुलीने आपल्या आई वडिलांना घडलेली घडताना सांगितली. त्यानंतर दुसऱ्या मुलीनेही तिच्यासोबत घडलेला प्रकार मामला सांगितला. ही घटना समजताच आई वडिलांनी तात्काळ माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश घाटूळ आणि अशोक पवार या दोघांविरोधात गुन्हे दाखल केले. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
नागरिकांची मागणी
याघटनेने ऊसतोड मजुरांसाख्या स्थलांतरित कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामाच्या शोधात आलेल्या कुटुंबातील लहान मुलींच्या संरक्षणासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्यात याव्या अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Ahilyanagar Crime: श्रीरामपूरमध्ये थरारक गोळीबार; बंटी जहागिरदारचा उपचारादरम्यान मृत्यू, शहरात तणाव
Ans: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात.
Ans: गावातील किराणा दुकानदार गणेश घाटूळ आणि ट्रॅक्टर चालक अशोक पवार.
Ans: दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे






