Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: पहिली पत्नी जिवंत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा विवाह; लग्नमंडपातच पत्नीला बेदम मारहाण

नांदेडमध्ये पहिली पत्नी जिवंत असताना आणि कायदेशीर घटस्फोट न घेताच दुसरा विवाह करत असल्याचा आरोप एका पोलीस कर्मचाऱ्यावर झाला आहे. लग्न थांबवण्यासाठी आलेल्या पत्नीला लग्नमंडपातच कथित मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 10:03 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करत असल्याचा पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप.
  • लग्नमंडपात पत्नीला कथित मारहाण; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.
नांदेड: कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याबाबत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पहिली पत्नी जिवंत असताना आणि कायदेशीर घटस्फोट न घेताच दुसरा विवाह करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, हे लग्न थांबवण्यासाठी आलेल्या पहिल्या पत्नीला लग्नमंडपातच नवरदेवाच्या वेशात असलेल्या पतीने कथितरित्या मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

नांदेड पोलीस दलातील कर्मचारी प्रशांत गजभारे यांचा 2022 मध्ये शारदा गजभारे यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगी आहे. संसार सुरू असताना दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. दरम्यान, 5 जुलै रोजी फेसबुकवर पतीच्या कथित दुसऱ्या विवाहाचे फोटो पाहिल्यानंतर शारदा गजभारे यांना हा प्रकार समजला.

Kolhapur Crime: आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; एसटी स्टँडवरच भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या

यानंतर त्या आपल्या नातेवाईकांसह वसमत शहराजवळील ‘कृष्ण मंगल कार्यालयात’ पोहोचल्या. त्यांनी पतीला दुसरे लग्न का करत आहात, असा जाब विचारत विवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या प्रशांत गजभारे यांनी पहिल्या पत्नीला कथितरित्या बेदम मारहाण केली. तसेच तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शेकडो वऱ्हाडी पाहत राहिले

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या वेशातील पोलीस कर्मचारी महिलेला मारहाण करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या शेकडो वऱ्हाडी आणि नातेवाईकांनी हा प्रकार पाहिला, मात्र कोणीही हस्तक्षेप करून मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.

गुन्हा दाखल

या मारहाणीत शारदा गजभारे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे यांच्यासह अन्य 12 जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीडित महिलेने, “मला न्याय मिळावा आणि माझ्या दोन वर्षांच्या मुलीला तिच्या वडिलांचा आधार मिळावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Yavatmal News: हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: वसमत, हिंगोली.

  • Que: पोलीस कर्मचाऱ्यावर कोणता आरोप आहे?

    Ans: पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह केल्याचा.

  • Que: या प्रकरणात किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: 12 जणांविरुद्ध.

Web Title: Nanded crime police employee marries a second time while first wife is alive wife brutally beaten right inside the wedding venue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
1

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
2

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
3

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.