
crime (फोटो सौजन्य: social media)
Yavatmal Crime: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून खून! पतीकडून पत्नीच्या प्रियकराची हत्या
कोणते गुन्हे दाखल
भूषण लोंढे व त्याच्या टोळीविरुद्ध सातपूर, अंबड, गंगापूर यासह अनेक पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी, प्रॉपर्टी हडपणे आणि दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. संघटित गुन्हेगारीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी लोंढे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. टोळीचा प्रमुख प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. भूषण मात्र सतत ठिकाण बदलत पळ काढत होता.
कार्यालयात भुयारी मार्ग
तपासादरम्यान पोलिसांनी सातपूरमधील लोंढे टोळीच्या कार्यालयावर धाड टाकली होती. यावेळी कार्यालयात एक भुयारी मार्ग आढळून आला होता, ज्यामुळे पलायनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचा संशय बळावला. तसेच नंदिनी नदीकाठावर परवानगीशिवाय बांधलेले अनधिकृत कार्यालय संयुक्त बुलडोझर कारवाईत पाडण्यात आले होते. या टोळीच्या बेकायदेशीर कामांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
चौकशी सुरु
भूषणच्या अटकेमुळे ओरा बार गोळीबारासह टोळीशी संबंधित अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांचे पथक आता त्याची चौकशी करत असून लोंढे टोळीच्या गुन्हेगारी जाळ्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. नाशिकमध्ये वाढत्या संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरणार असल्याचे अधिकारी सांगतात.
डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; कुटुंबियांनी केला ‘हा’ गंभीर आरोप
Ans: उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवरील गुप्त मोहिमेत पोलिसांनी ताब्यात घेतला.
Ans: खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत निर्माण करणे, प्रॉपर्टी हडपणे इ.
Ans: उपचारानंतर चौकशी, टोळीच्या गुन्हेगारी जाळ्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा.