Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

नाशिकच्या मनमाडमध्ये गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून कारचालकाने दुचाकीस्वाराच्या पोटात चाकू खुपसून जीवघेणा हल्ला केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला, मात्र पोलिसांनी २५ किलोमीटर पाठलाग करून त्याला अटक केली. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 08:20 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गाडीला कट मारल्याच्या वादातून कारचालकाने दुचाकीस्वारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
  • आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल २५ किलोमीटर पाठलाग करून त्याला अटक केली.
  • जखमी इरफात बेग याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वारावर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आला आहे. यामुळे दुचाकीस्वाराच्या पोटात थेट चाकूने वार केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

इरफात बेग असे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. इरफात हा आपल्या दुचाकीवरून मनमाड शहरातील चोपडा पेट्रोल पंपाजवळून जात होता. याच वेळी येवल्याच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या एका कारचा इरफातच्या दुचाकीला कट लागला. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी इरफातने कार चालकाला अडवले. मात्र, कार चालकाला याचा इतका राग आला की, त्याने कसलाही विचार न करता थेट चाकू काढला आणि इरफातच्या पोटात खुपसला.

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पोलिसांचा 25 किलोमीटर थरारक पाठलाग

इरफातवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून कारसह सुसाट वेगाने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तत्काळ वायरलेसवरून मेसेज पाठवून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले. आरोपी कारसह येवल्याच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी तब्बल 25 किलोमीटरपर्यंत या कारचा थरारक पाठलाग केला.

पोलिसांच्या अंगावर घातली कार

मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून येवला पोलिसांनी शहराजवळ नाकाबंदी करून आरोपीची कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर पोलीस उभे असल्याचे पाहूनही मुजोर कार चालकाने कारचा वेग कमी करण्याऐवजी ती थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि जीवाची बाजी लावून बाजूला होत कारची नाकेबंदी केली आणि अखेर आरोपीला घेराव घालून बेड्या ठोकल्या.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात; जखमी तरुण रुग्णालयात

पोलिसांनी अटक केलेल्या या मुजोर कार चालकाचे नाव लक्ष्मीकांत शेजवळ असे आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून, त्याच्याविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील चोपडा पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीला पोलिसांनी कशी अटक केली?

    Ans: आरोपी कारसह फरार झाल्यानंतर पोलिसांनी २५ किलोमीटर पाठलाग करून नाकाबंदी करत त्याला अटक केली.

  • Que: जखमी तरुणाची प्रकृती कशी आहे?

    Ans: चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इरफात बेग याच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Nashik crime car driver stabs motorcyclist in the stomach after a close cut chilling incident captured on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
1

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.