crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक : नाशिक शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरू आहे. शहरातील पंचवटी भागात गेल्या महिन्यात एका शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र या मृत्यूला कारणीभूत म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबातील सदस्यांनी केली होती. मात्र या प्रकरणात मृत व्यक्तीच स्वतः च्या मृत्यूला जबाबदार असल्याचं सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण पोलिसांनी मृत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला आहे. मधुकर झेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. ते रस्त्यावरील खड्डड्यात पडले आणि अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
नाशिक पोलीस काय म्हणाले ?
मधुकर झेटे हेच या अपघाताला जबाबदार आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत विना हेल्मेट गाडी चालवणे आणि बेदरकारपणे गाडी चालवली त्यात त्यांचा मृत्यू झाल्याच पोलिसांनी सांगितला आहे. खड्ड्यात पडल्यावर त्यांच्या कानातून रक्त आले. रात्रीची वेळ होती. गाडी ओव्हरटेक करत होते. गाडीला लाइट नव्हती ते खड्ड्यात पडले. त्यांच्या डोळ्यालाही मार लागला होता. उपचारांसाठी दाखल करण्यात आल, मात्र उपचारदरम्यान त्यांचा यात मृत्यू झाला आहे. पंचासमक्ष पंचनामा करून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय देण्या ऐवजी मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे.
रस्त्यावर खड्डा जबाबदारी कोणाची ?
मधुकर झेटे यांनी हेलमेट घातला नाही ही त्यांची चूक असेल, मात्र रस्त्यावर पडलेले खड्डे ही जबाबदारी कोणाची आहे? रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला सर्वसामान्य माणूस जबाबदार आहे का? खड्डे आहेत म्हणून गाडी चालवणे बंद करायची का? असे संतप्त सवाल आता नाशिककर उपस्थित करत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे की नाही? खड्ड्यात पडून जीव जाणार असेल आणि गाडी चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत असेल तर हे अजब आहे. पोलिसांनी जी तत्परता या प्रकरणात दाखवली ती इतर प्रकरणात दाखवणार का? नाशिक शहरात रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत त्याचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. नाशिककरांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावं लागतोय. खड्डे बुजवण्यासाठी प्रशासन काय पुढाकार घेणार की गाडी चालवणाऱ्यांवरच गुन्हा दाखल करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरले आहे.