फोटो सौजन्य: Gemini
नेवासा येथे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या वारसनोंदी लावून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी Newasa Police Station येथे सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोजेस संजय जाधव (रा. नेवासे खुर्द) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नेवासे बुद्रुक शिवारात त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित 21 एकर 17 गुंठे शेती असून ती पणजोबा केरू भगवंता जाधव (मृत) यांच्या नावावर आहे. फिर्यादीचे आजोबा आणि चुलत आजोबा कामानिमित्त बाहेरगावी राहत होते. तसेच वडील संजय मधुकर जाधव (मृत) हेही बाहेरगावी असल्यामुळे या जमिनीची वारस नोंद वेळेत घेता आली नव्हती.
फेब्रुवारी 2026 मध्ये मोबाईलवरील ऑनलाईन अॅपद्वारे शेत गट उतारा तपासला असता त्या जमिनीच्या गट क्रमांकावर शरद पिटर जाधव आणि प्रमिला भोसले यांची नावे नोंद झाल्याचे दिसून आले. याबाबत तलाठी कार्यालयात चौकशी केली असता ई-फेरफारमधील कागदपत्रे तपासताना सचिन रतन धोंगडे (नेवासे बुद्रुक) आणि संदीप आप्पासाहेब मुठे (मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर, सध्या नेवासे तहसीलसमोर सेतूचालक) यांनी संगनमत करून खोटे वारस प्रतिज्ञापत्र तयार करून बनावट वारस दाखले तयार केल्याचे उघड झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा
या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज आहिरे करत आहेत.
या प्रकरणात सहा जणांची बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती. तसेच खोटे वारस दाखले आणि वारस नोंद प्रतिज्ञापत्र तयार केल्याचे आढळून आले. ग्रामपंचायतसह संबंधित कार्यालयांनी या सर्व प्रमाणपत्रे बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. सरपंच, पोलिस पाटील आणि सोसायटी चेअरमन यांच्या सह्या व शिक्क्यांचीही बनावट नक्कल करून वारस दाखले तयार करण्यात आले.
दुय्यम निबंधकांसमोर शरद पिटर जाधव आणि प्रमिला सचिन भोसले या दोघांना खोटे वारसदार म्हणून उभे करून खरेदीखत करण्यात आले. या व्यवहारात साक्षीदार म्हणून सेतूचालक सचिन धोंगडे आणि संदीप मुठे यांच्या सह्या असल्याचेही समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.
विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात
या प्रकरणी खालील सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे:






