Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: खाकी वर्दीचा बनाव, AI चा वापर, प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची फसवणूक; आरोपी गजाआड

नाशिकमध्ये AI चा वापर करून बनावट पोलीस फोटो तयार करत महिलांना प्रेमजाळ्यात ओढून 3 लाखांची फसवणूक करणारा आरोपी आसिफ तडवी अटकेत. पैसे न दिल्यास मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल केल्याचे उघड.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 09:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • AI च्या मदतीने बनावट पोलीस फोटो तयार करून विश्वास संपादन
  • प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेकडून 3 लाखांची उकळपट्टी
  • मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल; मोबाईलमधून अनेक पुरावे जप्त
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून, खाकी वर्दीचा बनाव करून महिलांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने स्वतःचे पोलीस गणवेशातील बनावट फोटो तयार करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी गजाआड केल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपीचे नाव आसिफ तडवी असे आहे. आसिफ तो मूळचा सिल्लोडचा रहिवासी आहे. आसिफ सोशल मीडियावर पोलीस अधिकारी असल्याचे भासवून बनावट नावाने खाती उघडली होती. त्याने AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे पोलीस ठाण्यात बसलेले आणि पोलीस गणवेशातील अत्यंत हुबेहूब दिसणारे फोटो तयार केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तो महिलांवर आपली छाप पाडत होता.

Akola Crime: अकोल्यात क्रूर हत्याकांड! ८ दिवसांच्या बाळाच्या आईची गळा दाबून हत्या; मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत

इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने एका महिलेशी संपर्क साधला. खाकी वर्दीचा रुबाब दाखवून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एकदा विश्वास संपादन केल्यानंतर, कधी घरगुती अडचणींचे कारण तर कधी पोलीस ट्रेनिंगचा बहाणा सांगून त्याने या महिलेकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले. जेव्हा पीडित महिलेने अधिक पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आसिफने आपले खरे रूप दाखवले. त्याने AI च्या मदतीने पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

आरोपी गजाआड

या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने धीर धरून वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. संशयित आसिफ हा महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आला असता, वावी पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले आणि त्याने धक्कादायक खुलासे केले.

तपासात धक्कादायक खुलासे

पोलिसांनी आसिफने दोन मोबाईल जप्त केले असून, त्यात AI ने तयार केलेले पोलीस ठाण्यातील आणि वर्दीतील शेकडो फोटो आढळले आहेत. तडवीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांसोबत केलेले चॅटिंग, स्क्रीनशॉट आणि काही अश्लील व्हिडिओ देखील सापडले आहेत. यावरून त्याने केवळ एकाच महिलेला नाही, तर अनेक महिलांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढून लुटल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती केली अन्…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने फसवणूक कशी केली?

    Ans: AI ने बनावट पोलीस फोटो तयार करून स्वतःला अधिकारी दाखवत महिलांना फसवले.

  • Que: किती रक्कम उकळली?

    Ans: पीडित महिलेकडून सुमारे 3 लाख रुपये उकळले.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: तक्रारीनंतर सापळा रचून भेटायला आल्यावर आरोपीला अटक केली.

Web Title: Nashik crime impersonating police using ai to lure women into a love trap and defraud them accused behind bars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
1

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
2

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
3

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.