Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: लग्नासाठी हट्ट धरला, कुटुंबीयांनी होकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी प्रियकराचा खून

नाशिकच्या कळवण तालुक्यात प्रेमप्रकरणातून 25 वर्षीय सचिन चौरे याची हत्या करण्यात आली. आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाला होकार दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी मुलीच्या दोन भावांनी आणि मेव्हण्याने सचिनवर हल्ला करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 03:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाला कुटुंबीयांची संमती मिळाली होती.
  • मुलीच्या दोन भावांनी आणि मेव्हण्याने हल्ला केल्याचा आरोप.
  • पळून जाणाऱ्या आरोपींना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एकधक्कादायक प्रकार समोर आलं आहे. एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मुलीसोबत लग्नाला कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर अवघ्या काही तासातच तरुणावर जीवघेणा हल्ला करत हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुलीचे दोन भाऊ आणि मेहुण्याला पोलिसांनी आता केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना कळवण तालुक्यात घडली.

नेमकं काय घडलं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सचिन मोतीराम चौरे आहे. तो नरूळ येथील रहिवासी होता. सचिन चौरे याचे आठंबे येथील एका तरुणीसोबत गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील होते. मात्र त्यांच्या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. तरुणीने सचिनसोबत लग्न करण्याचा निर्धार केला होता. एवढेच नाही तर तिने घरात जेवणही बंद केल्याची माहिती आहे. या मुलीच्या हट्टापुढे कुटुंबियांना माघार घायवी लागली. मुलीचे वडील आणि मामा यांनी सचिनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली आणि लग्नाला तोंडी संमती देण्यात आली. यानंतर तरुणीला सचिनसोबत पाठवण्यात आले.

Odisa Crime: पंचायतीनंतरही शांत झाला नाही राग; मित्राची हत्या करून जंगलात पुरला मृतदेह; आरोपीला मुंबईतून अटक

दुसऱ्याच दिवशी आले आणि…

यांनतर रविवारी सचिनची बहीण आणि मेव्हण्याने या दोघांना कन्हेरवाडी येथील घरी नेले होते. तोपर्यंत सर्व काही सुरळीत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक मुलीचे दोन भाऊ आणि मेव्हणा कन्हेरवाडी येथे पोहोचले. यांनतर त्यांनी सचिनवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. थेट छातीवर वार करण्यात आल्याने सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना पकडले. संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना चांगलाच चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

रुग्णालयात आरोपींवर हल्ला

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणले. दरम्यान, मृत सचिनच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपींना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात हलवले. यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे कळवण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rajasthan Crime: शेजारीणच्या घरात गेली अन् परत आलीच नाही…, 5 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: सचिन मोतीराम चौरे असे मृत तरुणाचे नाव होते.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे ही घटना घडली.

  • Que: आरोपींना कसे पकडण्यात आले?

    Ans: पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Nashik crime insisted on marriage family agreed and the very next day the lover was murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं
1

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं

Nashik News: पूर ओसरताच गोदापात्र बनले ‘खुले सर्व्हिस स्टेशन’; वाहनधारकांकडून सर्रास वाहन धुलाई
2

Nashik News: पूर ओसरताच गोदापात्र बनले ‘खुले सर्व्हिस स्टेशन’; वाहनधारकांकडून सर्रास वाहन धुलाई

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात
3

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात

Nashik News: नाशिकमध्ये जलसंकट टळले! मोठ्या व मध्यम धरणांमध्ये ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा
4

Nashik News: नाशिकमध्ये जलसंकट टळले! मोठ्या व मध्यम धरणांमध्ये ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.