Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: लग्नाला केवळ सहा महिने आणि… नवविवाहितेने संपवलं आयुष्य; सहा पानी सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप

नाशिकच्या हिरावाडीत नवविवाहित नेहा पवारने सासरच्या सततच्या मानसिक छळाला, चारित्र्यावरच्या संशयाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली. सहापानांच्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 27, 2025 | 12:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नवविवाहित नेहा पवारने विषप्राशन करून आत्महत्या केली.
  • सासू, नणंद आणि पतीकडून चारित्र्यावर संशय, शिवीगाळ व मानसिक छळ.
  • हुंड्याच्या मागण्या, पैशासाठी दबाव आणि घरकामावरून टोमणे.
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेने छळाला आणि मानिसक त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना हिरावाडी परिसरात घडली. आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव नेहा पवार असे आहे. नेहाने विषप्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. वारंवार नेहाचे सासू, नणंद आणि पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास देण्यात येत होता. याच त्रासाला कंटाळून नेहा पवार या नवविवाहितेने लग्नानंतर ६ महिन्यातच आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट पण लिहून ठेवली.सुसाईड नोट मध्ये तिने गंभीर आरोप केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dombivali Crime: किरकोळ वादाचं भीषण शेवट! पतीने पत्नीचा घेतला जीव, तीन मुले पोरकी; डोंबिवली येथील घटना

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी दि. २६) दुपारी एक वाजताच्या सुमारास नेहा पवारने राहत्या घरी विषारी औषधाचे सेवन केले. याची माहिती मिळताच पतीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र सायंकाळी पावणेपाच वाजताच्या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले आणि पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. पोलिसांना घटनेची पाहणी करतांना नेहाने लिहलेली सुसाईड नोट मिळाली. तिने पोलिस आणि भावाच्या नावे सुसाईड नोट लिहून ठेवली.

‘सुसाइड नोट’मध्ये काय?

‘माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असून, माझे लग्न ४ जून २०२५ रोजी रेशीमबंध बँक्वेट हॉलमध्ये झाले. १० मार्चला सुपारी फोडल्यावेळी माझ्या सासरच्यांनी म्हटले की, हुंडाप्रथा बंद आहे. तरी तुम्ही नवरदेवास त्याच्या अटी-शर्तीनुसार सोने, चांदी, पाच भांडे द्या. त्यानुसार माझ्या माहेरच्यांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर सासरचे भांडण करीत नाही पण, मानसिक त्रास देतात.’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.

‘मोबाइलवर सारखी बोलते, घरकाम येत नाही, पतीला उलटसुलट सांगते. सिलिंडर टाकी एक महिन्यातच संपते. पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध असून, पतीने तिला दोघांचे अश्लील फोटो दाखवले होते. सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्याने माहेरहून २० हजार रुपये आणून दिले. दिवाळीसाठी १५ दिवस माहेरी पाठवले. मात्र, दहाव्या दिवशी सासू व पतीने सासरी येण्यास सांगितले. नियमित मासिक पाळी येत नसल्याने सासरच्या लोकांनी त्रास दिला. भाऊ सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवत आहे. माझे नशीब खराब असून, मला सासर चांगले मिळाले नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे’, असेही तिने चिठ्ठीत लिहिले आहे.

एक नणंद माहेरी येऊन बसली आहे. तिच्यासह तिच्या मुलांचंही करावं लागतं, नंणंदा, नवरा, सासूचे कान भरतात, त्यावरुन घरात मानसिक छळ केला जात असल्याचंही तिने नोटमध्ये लिहिलं आहे. ती काहीच काम करत नाही, सतत मोबईलवर असते, माहेरच्यांशी सारखी गप्पा मारत असते असे कान भरतात. माझ्या सासरच्यांनी माझी फसवणूक केली. 15 लाख रुपये देऊन माझ्या भावाने लग्न लावलं, माझ्या नवऱ्याची परिस्थिती खराब आहे असं दाखवण्यात आलं, म्हणून मी माझ्या माहेरातून 20 हजार रुपये मदत आणून दिली. ते दिले नसते तर त्यांनी अजून छळ केला असता अशी भीती सतत मनात होती. माझ्या घरच्यांनाही माझ्याविरोधात भडकवण्यात आलं. नांदायला आल्यापासून नवऱ्याने दोन वेळा मारलं. आईवरुन शिवीगाळ करतो. इतकंच नाही तर माहेरी तुझा कोणी यार ठेवला असेल असे सतत बोलून चारित्र्यावर संशय घेत होता असंही नवविवाहितेनं म्हटलं आहे.

गुन्हा दाखल

हि चिठ्ठी अंगावर काटा आणणारी आहे. सासरचे लोक ही चिठ्ठी गायव करतील म्हणजेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतील म्हणून तिने या चिठ्ठीचा फोटो काढून सगळ्यांना पाठवले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता या प्रकरणाचा तपास करत आहे.

Ahilyanagar Crime: शरद पवार गटाच्या नेत्यावर सत्तूर–तलवारीने हल्ला, 15 जणांचा गँग-अटॅक; प्रकृती चिंताजनक

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेहा पवारने आत्महत्या का केली?

    Ans: सासरच्या सततच्या मानसिक छळाला, चारित्र्यावरच्या संशयाला, शिवीगाळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले.

  • Que: सुसाईड नोटमध्ये काय उल्लेख आहे?

    Ans: हुंड्याची मागणी, पतीचे प्रेमसंबंध, मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ आणि खोट्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या तणावाची सविस्तर माहिती.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी सहापानांची नोट जप्त करून पती, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Nashik crime just six months into the wedding and newlywed ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?
1

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

फलटणमध्ये बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; तरुणाची हत्या, एकाच कुटुंबातील चौघे अटकेत; नेमकं प्रकरण काय?
2

फलटणमध्ये बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; तरुणाची हत्या, एकाच कुटुंबातील चौघे अटकेत; नेमकं प्रकरण काय?

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?
3

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप
4

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.