Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: कर्ज फेडलं… तरी कोट्यवधींची जमीन विकली? शेतकऱ्याचा गंभीर आरोप; ताबा घेताना पोलिसांशी झटापट

नाशिकच्या दिंडोरीतील निळवंडी येथे OTS योजनेअंतर्गत कर्ज फेडूनही बँकेने कोट्यवधींची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांत विकल्याचा शेतकरी कुटुंबाचा आरोप आहे. जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी झटापट झाली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 04, 2026 | 08:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • OTS अंतर्गत कर्ज फेडूनही जमीन विकल्याचा शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप.
  • जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकरी कुटुंबामध्ये झटापट; व्हिडीओ व्हायरल.
  • काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे एका शेतकरी कुटुंबाने बँकेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत संपूर्ण कर्ज फेडूनही बँकेने परस्पर कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांत विकल्याचा दावा करण्यात आला आहे. या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस आणि बँक कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिंडोरी येथील एका शेतकरी कुटुंबावर बँकेचे 7 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज त्यांनी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत पूर्णपणे भरले होते. असे असतानाही बँकेच्या काही स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील सेंट्रल ऑफिसला चुकीची माहिती पुरवली. परस्पर कागदपत्रे तयार केल्याचा आणि स्थानिक एजंटशी संगनमत करून शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून केला जात आहे.

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर…

पोलिसांची अरेरावी

जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी बँकेचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी शेतकरी कुटुंबाने या कारवाईला तीव्र विरोध केला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये मोठा गोंधळ आणि झटापट झाली. कारवाईदरम्यान पोलिसांनी अरेरावी केल्याचा तसेच मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रित करणाऱ्या एका युवकाला मारहाण केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

न्यायालयाचा आदेश आणि…

दरम्यान, या आरोपांवर पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस पथक घटनास्थळी गेले होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठीच पोलिसांची उपस्थिती होती, असा दावा प्रशासनाने केला आहे.

नाना पटोलेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर (X) शेअर करत पोलीस आणि बँक प्रशासनाच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. संपूर्ण कर्ज भरलेलं असताना शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा आणि लाठीहल्ला करणाऱ्या या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Pune Murder Case : 14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून; पर्वतीमधील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेतकरी कुटुंबाचा मुख्य आरोप काय आहे?

    Ans: कर्ज फेडूनही बँकेने जमीन परस्पर विकल्याचा आरोप.

  • Que: वाद नेमका कशामुळे झाला?

    Ans: जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस आणि बँक कर्मचारी गेल्याने.

  • Que: या प्रकरणात नाना पटोले यांनी काय मागणी केली?

    Ans: उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशीची मागणी.

Web Title: Nashik crime loan repaid yet land worth crores sold farmer makes serious allegation scuffle with police during possession attempt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
2

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
3

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.