Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांचे सापडले मृतदेह, आत्महत्येचा संशय

नाशिकच्या देवळा तालुक्यात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळले. पतीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज, तर पत्नी व दोन्ही मुलं झोपेत मृतावस्थेत. पोलिस तपास सुरू असून कारण अस्पष्ट आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 01:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • देवळा तालुक्यातील फुले माळीवाड्यात चार जणांचे मृतदेह घरात आढळले.
  • पतीने आत्महत्या केली, तर पत्नी आणि मुलांचे मृत्यू संशयास्पद.
  • पोलिस आणि फॉरेन्सिक टीम तपासात.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांचे दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही घटना देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्ती केली आहे.

TET पेपरफुटीचे कनेक्शन परराज्यात; आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक थेट बिहारकडे रवाना

पतीने घेतला गळफास तर…

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद बाळू शेवाळे (40), त्यांची पत्नी कोमल गोविंद शेवाळे (35), मुलगी खुशी गोविंद शेवाळे (8) आणि दीड–दोन वर्षांचा मुलगा श्याम गोविंद शेवाळे असे मृतदेह वाढलेल्या व्यक्तींचे नाव आहे. गोविंद याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली तर पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. मात्र या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे.

पोलीस तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी उपस्थतीत झाले. अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या घटनेमागचं कारण काय याचा तपास घेत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

घरात सापडले 3 कुजलेले मृतदेह! कुटुंबाने उचललं टोकाचं पाऊल,नेमकं कारण काय?

दरम्यान अशीच एक घटना हैदराबाद मध्ये देखील घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. पाच महिन्यापुरीच कुटुंबातील थोरल्या मुलीने आत्महत्या केली होती. आता तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक श्रीनिवास, त्याची पत्नी विजयालक्ष्मी आणि त्यांची मुलगी श्रव्या असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तींचे नावे आहे. थोरल्या मुलीचे नाव काव्या असे आहे.

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शनिवारी घराचा दरवाजा तोडले. तेव्हा त्यांना हा कुजलेले मृतदेह आढळले. तिघांचेही मृतदेह हे घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. श्रीनिवासच्या पत्नी विजयालक्ष्मीचा मृतदेह हा हॉलच्या खिडकीच्या दिशेला लटकलेल्या स्वरुपात आढळला. तर श्रााव्याचा मृतदेह हॉल आणि बेडरुममधील दाराच्या चौकटीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. २० नोव्हेंबरला त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कारण काय?

या प्रकरणात श्रीनिवासच्या बहिणीने तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. या तिघांनी टोकाचे निर्णय का घेतले, यामागचं कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान पोलिसांना सुसाईड नोट सापडली. माझी मोठी मुलगी गेली आहे आणि देवही आम्हाला बोलावत आहे असे विधान सुसाईड नोट मध्ये आहे.

धक्कादायक ! प्रियकराची हत्या; प्रेयसीने मृतदेहासोबत केले लग्न, नंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे ही घटना उघडकीस आली.

  • Que: कुटुंबातील कोणत्या सदस्यांचे मृतदेह सापडले?

    Ans: पती, पत्नी आणि दोन्ही अल्पवयीन मुलांचे मृतदेह घरात आढळले.

  • Que: ही घटना आत्महत्या आहे की काही वेगळं?

    Ans: पतीने गळफास घेतल्याचा अंदाज असला तरी इतर मृत्यूंचं कारण स्पष्ट नाही; पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Nashik crime nashik shaken bodies of four members of the same family found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.