Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

नाशिकमध्ये किन्नर गद्दीपतींसह दोघांवर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप झाला आहे. युवकाच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 03:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी.
  • १५ लाख रुपये मागितल्याचा युवकाचा आरोप.
  • पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
नाशिक: नाशिक शहरात ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. किन्नर गद्दीपतींसह दोघांनी अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १५ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार एका युवकाने पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली असून, संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

नेमकं प्रकरण काय?

पंचवटीतील गजानन चौक परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाची ओळख सन २०२० मध्ये एका तरुणाच्या माध्यमातून पार्वती नावाने ओळख करून देतात असलेल्या व्यक्तीशी झाली. ही व्यक्ती किन्नरसारखा वेश परिधान करत होती आणि कालिकानगर परिसरात राहत होती. संबंधित ठिकाणी देवीचा दरबार भरवला जात असल्याने, ओळखीच्या माध्यमातून युवकाचे त्या घरी येणे-जाणे सुरू झाले.

त्यानंतर संशयिताने युवकाचे नग्न अवस्थेतील अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही काळानंतर तक्रारदार युवकाला ‘पार्वती’ ही व्यक्ती नसून, अब्दुल जलालउद्दीन शेख असल्याचे समजले. यानंतर युवकाने त्याच्याशी संपर्क कमी केला. त्यांनतर संशयित अब्दुल शेख याने आत्महत्या करण्याची धमकी देत युवकावर मानसिक दबाव टाकल्याचा आरोप आहे.

मागील सहा महिन्यांपासून युवकाच्या मोबाईलवर सत्ता फोन करत नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती. याचबरोबर १५ लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर पैसे न दिल्यास धर्मांतर करण्यासाठी दबाव आला आणि धर्मांतरास नकार दिल्यास युवक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

तपास सुरु

यानंतर तक्रारीच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित अब्दुल जलालउद्दीन शेख आणि सलमा नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपासात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच मृतदेह सापडले; घरात लिहिलेली चिठ्ठी, बाजूला दुधाचे ग्लास…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक शहरात.

  • Que: किती रकमेची खंडणी मागितली?

    Ans: १५ लाख रुपये.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Web Title: Nashik crime threat to make obscene photos viral on transgenders charged with extortion of rs 15 lakh case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.