काय नेमकं प्रकरण?
मृतकाचे नाव रेश्मा( वय २३) असे आहे. तिचे लग्न आरोपी लईक जावेद अन्सारी याच्याशी सुमारे सहा महिन्यापूर्वी दुसरे लग्न झाले होते. पहिल्या लग्नातून रेश्माला पाच वर्षांची एक मुलगी असून कौटुंबिक वादामुळे ती पहिल्या पतीपासून वेगळी झाली होती. त्यांनतर आरोपीने दुसरे लग्न केले. काही काळ शांततेत गेला आणि त्यानंतर पतीकडून शारीरिक संबंधाच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण सुरु झाली. याची माहिती रेश्माने वारंवार माहेरच्यांना सांगितले होते.
त्यानंतर मुदोन्ही कुटुंबीयांची बैठक घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रेश्मावर होणार छळ थांबला नव्हता, असे तिने पुन्हा माहेरच्यांना कळवले. 24 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री रेशमा माहेरी आली आणि पुन्हा त्रास होत असल्याची माहिती दिली. मात्र रात्री उशीर झाल्याने सकाळी पाहू, असे सांगून तिला परत पाठवण्यात आले.
फोन करून मित्राला सांगितले आणि…
मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपीने आपला मित्र तौसीफ शेख याला फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. त्यांनतर तौसिफ़ याने मृत रेशमाचे वडील ईद्रीस मुक्तार शेख (वय 41, रा. इंदिरानगर, कन्नड) यांनी फोन करून दोघांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले. माहिती मिळताच माहेरचे लोक तातडीने रेश्माच्या घरी पोहोचेले. मात्र घराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याचे दिसले. त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना रेशमा घरात जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेली आढळली.
तिच्या गळ्यावर काळसर जखमा दिसून येत होत्या, तर डोळे आणि ओठ सुजलेले होते. तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत रेशमाचे वडील इद्रीस मुक्तार शेख यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जन्मठेपेची शिक्षा
पोलीस या घटनेचा तपास सुरु केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी एकूण 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. साक्षी, पुरावे आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
Ans: लईक जावेद अन्सारी, वय 36.
Ans: रेशमा, वय 23.
Ans: जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड.






