कशी उघडकीस आली घटना
खप्परपूर येथील रहिवासी ३५ वर्षीय मनीष हा शेतकरी होता. सकाळी घरातून कोणीही बाहेर न आल्याने लोकांना संशय आला. त्यांना घरात मनीष, त्याची पत्नी, ३२ वर्षीय सीमा, पाच वर्षीय मुलगी हनी, चार वर्षीय प्रियांशी आणि दोन वर्षांचा मुलगा पंकज यांचे मृतदेह पडलेले आढळले. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलीस कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांकडून माहिती घेत आहेत. मात्र त्यांनी हत्या का केली हे पोस्टमार्टम रिपोर्टसनंतर कारण समजले.
चिठ्ठी मिळाली
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वयंपाकघरातील भिंतीवर एक चिठ्ठी लिहिलेली होती. यामध्ये “आम्ही आत्महत्या करत आहोत.” ही घटना रात्री उशिरा घडली असून सकाळी सर्वजण जागे झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना समजले.
काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन
मनीषचे इतर दोन भाऊ शेजारी राहतात. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. पाच मृतदेह पाहून लोकांमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Keral Crime: केरळच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर चिन्नू पप्पूचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात?
प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद
उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरलं त्यामुळे त्याच्या प्रेयसीने संतापून त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली असून, न्यायालयाने तिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षा आणखी वाढवली जाऊ शकते.
Ans: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील खप्परपूर गावात.
Ans: एकाच कुटुंबातील पाच जणांचा.
Ans: दुधात विष मिसळून आत्महत्या केल्याचा संशय.






