Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, एकाला 6 कोटी आणि तर दुसऱ्याला 72 लाखांचा गंडा

नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी डिजिटल अरेस्टच्या माद्यमातून दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींनी लुटण्यात आला तर दुसऱ्याला ७२ लाखांनी गंडा घेण्यात आला

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 14, 2025 | 03:00 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

नाशिक: नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी डिजिटल अरेस्टच्या माद्यमातून दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींनी लुटण्यात आला तर दुसऱ्याला ७२ लाखांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट केलं आणि हे पैसे उकळले.

या दोन्ही प्रकरणात विशेष असे की भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाईन हजर करत असल्याचं भासवण्यात आलं. एवढच नाही तर भीती दाखवून हे पैसे उकलण्यात आल्याचं समोर आलं आहे. घाबरलेल्या नागरिकांनी आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे भरण्यास भाग पडल्याचं समोर आलं आहे.

Crime News: कोल्हापूर पोलिसांची कामगिरी दमदार! 20 महिन्यांपासून फरार असलेल्या ‘त्या’ कुख्यात आरोपीला अटक

काय सांगून लुटण्यात आलं?

पहिलं प्रकरण हे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिका सोबत घडली. त्यांना एक व्हिडीओ कॉल आला. त्याच्या सिमकार्डच्या माध्यमातून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याचं त्यांना सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकारामुळे तो ज्येष्ठ नागरिक घाबरला. याच परिस्थितीची संधी घेत ६ कोटी रुपये ट्रान्स्फर करायला भाग पाडलं.

दुसऱ्या प्रकरणात अनिल लालसरे या ज्येष्ठ नागरिकाला ७२ लाखांचा गंडा घालण्यात आला. तुमच्या आधारकार्डवरून क्रेडिट कार्ड इशू झाले असून त्या माध्यमातून गैरव्यवहार झाला असल्याची भीती त्याला घालण्यात आली. त्यामुळे ७२ लाख रुपयांचा दंड भरला नाही तर सीबीआयचे पथक अटक करून दिल्लीला घेऊन अशी दमबाजी करण्यात आली. त्यामुळे लालसरे यांनी ७२ लाख रुपये आरटीजीएस केले आहे. या दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

आजीच्या डोळ्यादेखत आठ वर्षीय चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू

नाशिक शहरातून एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. यात दुचाकीवरून आजीसोबत जात असलेल्या आठ वर्षांच्या नेव्हीने नेरकर या चिमुरडीचा, भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. ११) सकाळी, पाईपलाईन रोडवरील रिलायन्स जिओ पेट्रोलसमोर घडला आहे.

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून ट्रक जप्त केला आहे. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा गेम ओव्हर; पोलिसांनी परदेशात लावली फिल्डिंग, आता थेट…

Web Title: Nashik senior citizens cheated in the name of digital arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.