crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक: नाशिक येथून वडाळा नका परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ केवळ लांघूशंकेच्या करण्यावरून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात ३५ वर्षीय बंडू लक्ष्मण गांगुर्डे या मजुराचे नाव असून तो आपल्या पत्नीसोबत पुलाखाली वास्तव्यास होता. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
Keral Crime: केरळ हादरलं! पतीने पत्नीचा गळा चिरून केली निर्घृण हत्या, फेसबुक लाइव्हवर दिली कबुली
नेमकं काय घडलं?
आरोपी जयेश दीपक रायबाहूदार हा सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करत होता. त्यावर बंडूने आक्षेप घेतला. “येथे लघुशंका करू नकोस,” असे म्हणताच, संतप्त झालेल्या जयेशने जवळच्या धारदार चाकूने बंडूवर हल्ला चढवला. छाती व पोटावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर जयेश घटनास्थळावरून फरार झाला. या हल्ल्यात बंडू गंभीर जखमी झाला. जखमी बंडूला त्याची पत्नी नक्की गांगुर्डे व नातेवाइकांनी तातडीने रिक्षामार्फत जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यनंतर अक्की गांगुर्डे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
आरोपीचा शोध सुरु
पोलिसांनी जयेश रायबहादुर याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे. जयेशवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुलाखाली राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये तरुणींना बंद खोलीत डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक
दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना समोर येत आहे. महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पोलीस अथक प्रयत्न करत असून सुद्धा असे प्रकार घडत आहे. आता नाशिकच्या म्हसरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणी व तिच्या मैत्रिणीला हॉटेलमधून जबरदस्तीने डांबून, पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय कारण्याबाबत सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हॉटेलचालसह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हॉटेलचालकाचा इतिहास
संशयित सौरभ देशमुख याचे ‘कॅटल हाउस’ नावाचे हॉटेल असून, त्याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर कृत्यांबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सौरभ हा एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याच्याकडून हॉटेलमध्ये अनेकदा अनैतिक व गैरकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी असून, पोलिसांपासून बचावासाठी तो आणि त्याचे कर्मचारी वैयक्तिक वॉकी-टॉकी वापरत असल्याचेही उघड झाले आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंदेसह तिघांना न्यायालयाचा दणका