केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची समोर आला आहे. त्यांनतर त्याने फेसबुक लाईव्ह करत हत्येची कबुली दिली. नंतर, पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
हत्या झालेल्या महिलेची नाव शालिनी असे असून ती केवळ 39 वर्षांची आहे. ती वलाकोड येथे एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ही घटना घटना सोमवारी सकाळी जवळपास ६ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपीचं नाव ऐसेक असून त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पीडितेच्या मृत्यू झाला असून हत्येनंतर ऐसेकने आपल्या फेसबुक अकाउंटवर अडीच मिनिटांचा लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम केला आणि त्यात आरोपीने शालिनीची हत्या केल्याचं कबूल केलं.
व्हिडीओमध्ये आरोपीने काय म्हंटल?
ऐसेकने व्हिडीओमध्ये अनेक दावे केले आहे. शालिनीचे काही अज्ञात पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ती आपल्या मुलांकडे सुद्धा दर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, शालिनी पतीला त्याच स्वत:चं बनवलेलं घर सोडण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा दावा देखील पतीने गंभीर आरोप केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नीमधील कौटुंबिक वाद दोघेही बराच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. हत्येनंतर, लाइव्ह व्हिडीओ बनवून ऐसेक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, सकाळी जवळपास ९ वाजताच्या सुमारास पुनालुर पोलीस स्टेशनमध्ये त्याने स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिलं म्हणजेच सरेंडर केलं.
गुन्हा दाखल
पोलिसांनी पीडित शालिनीचा मृतदेह पुनालुर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणासंदर्भात आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
4 वर्षीय मुलाने पँटमध्ये शी केली म्हणून आई संतापली, गरम लोखंडी चमच्याने दिले चटके
केरळच्या अलेप्पी जिल्ह्यातून एक प्रकरण समोर आले आहे. एका मुलाने चुकून त्याच्या पँटमध्ये शी केली. हे पाहताच आई इतकी अस्वस्थ झाली की तिचा राग अनावर झाला. मग तिने असे काही केले की आई आहे की हैवान… असं बोलायची वेळ आली. आईने पोटच्या मुलाच्या चटके दिले. मुलाच्या पायांवर आणि पाठीच्या खालच्या भागात जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. सुरुवातीला मुलाची आई रुग्णालयात खोटे बोलत होती. पण तिच्या सासरच्या मंडळींनी मुलासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सत्य समोर आले. ही घटना केरळच्या एका गावात घडली आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; ‘या’ टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार