CRIME (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आयुष्य संपवले. तिने आत्महत्या केली असली तरी तिच्या शरिरावर मारहाणीचे अनेक डाग आणि व्रण दिसून आले आहेत. राज्यातून अनेक हुंडाबळीची आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे समोर आले. वैष्णवी हगवणे नंतर नाशिक मध्ये भक्ती गुजराथी ने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आता पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे.
धक्कादायक! वाढिवस साजरा करताना पिस्तूल मधून गोळी सुटली आणि थेट बर्थडे बॉयच्या छातीत घुसली…
मर्सिडीज कारची मागणी करत माहेरून 25 लाख रुपये आणण्यासाठी एका महिलेचा मानसिक छळ झाल्याचा उजेडात आला आहे. पीडित महिलेचा नाव स्नेहल घुले असं आहे. स्नेहल ही डॉक्टर आहे. तिचा विवाह एका आयटी इंजिनिअर सोबत झालं होता. या प्रकरणी महिलेचा पती, सासू- सासरे आणि दीर- ननंद यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनं सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पुण्यातील विहिरीत आढळला एकाचा मृतदेह
पुण्यातील धानोरी येथील कुकरेज सोसायटीसमोरील विहिरीत ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २३) समोर आला असून, मृत्यू नेमका कसा झाला आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दशरथ पाचू बारवते (वय 60, रा. भैरवनगर, आनंद पार्क, धानोरी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फुकटात पाणीपुरी खाल्ली अन् नंतर विक्रेत्यावर दगडाने हल्ला; बाणेरमधील घटनेने खळबळ