पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करत असतांना परवानाधारक पिस्तूल हाताळतांना निष्काळजीपणामुळे गोळी सुटल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख ( टेंभुर्णी, माढा) असे आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सराटी येथील जगदाळे फार्म हाऊसवर रविवारी (२४ मे) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर हादरलं! स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध आणि…; चिमुरडीच्या जमिनीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ उलघडल
नेमकं काय घडलं?
पुण्यात इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्मवरती वाढदिवसासाठी परवाना असलेलं पिस्तूल हलगर्जीपणाने हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झाला आहे. काळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्महाऊस वरती ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्महाऊसवर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने हे सर्वजण एकत्र आले होते. याच वेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल सुधीर महाडिक देशमुख हाताळत होते. याच वेळी या पिस्तूलमधून गोळी सुटली आणि थेट सुधीर महाडिक देशमुख यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली आणि ते जखमी झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी,एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशी वरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.प्रदीप जगदाळे, सुधीर महाडिक, विजय पवार आणि राजकुमार पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.