
crime (फोटो सौजन्य: social media)
शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक
आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध
या प्रकरणातील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कोर्टात सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आरोपीचे वीर्य आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या स्लॅकमध्ये आरोपीचा डीएनए आढळला आहे. त्यानेच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीचा खटला ठरला. आता आरोपीला फाशीची शिक्षा होणार का? याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे.
आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?
भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारले की, ‘तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?’, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती”, असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की ” आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी “. न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.
न्यायाधीश म्हणाले की, ही घटना समाजासाठी घातक आहे. त्या दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झालेत. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता तो कोणत्याही परिस्थितीत सुधरू शकत नाही. या आधीच्या दोन गुन्ह्यांमधे हा आरोपी दुर्दैवीरित्या सुटला होता. मात्र तो समाजासाठी घातक आहे. तो सुधारण्याच्या पलिकडे गेला आहे. त्यामुळे फक्त फाशी हीच या आरोपीला योग्य राहील, असे सरकारी वकील म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लगत नसल्याचा युक्तीवाद केला. त्याचबरोबर आऱोपीच्या वकिलांनी तो स्वत या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा आणि तो 65 वर्षांचा वृद्ध असल्याचा युक्तीवाद केला. तो वृद्ध असल्याने इतका क्रुर गुन्हा करु शकतो का? असाही आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जन्मठेप योग्य शिक्षा राहील असा दावा केला.
Ans: आरोपीचे नाव भीमराव कांबळे असून तो 65 वर्षीय आहे.
Ans: डीएनए अहवाल, साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यात आला.
Ans: सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.