Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Drug Free Campaign: नवी मुंबईत नशाविरोधी जनजागृतीला व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ नशामुक्ती अभियानाचा उद्या शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 06:22 PM
तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईत उद्यापासून ‘कॅम्पस कनेक्ट’ नशामुक्ती अभियान
  • मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत शुभारंभ
  • नशाविरोधी लढ्याला नवी मुंबईत बळ
सावन वैश्य | नवी मुंबई : अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या ‘नशामुक्ती नवी मुंबई’ अभियानाला आता आणखी व्यापक स्वरूप मिळणार आहे. या अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’सह विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ शनिवार, २२ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून वनमंत्री गणेश नाईक आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून एकीकडे कठोर कारवाई, तर दुसरीकडे जनजागृती आणि पुनर्वसनावर भर दिला जात आहे. विशेषतः विद्यार्थी आणि तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे.

२५० महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

‘कॅम्पस कनेक्ट’च्या माध्यमातून पोलीस अधिकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाचे आरोग्य आणि सामाजिक परिणाम तसेच त्यापासून दूर राहण्याचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात ‘अँटी-नार्कोटिक्स कमिटी’ स्थापन करण्यावरही भर देण्यात आला असून, शहरातील सुमारे २५० महाविद्यालयांनी या अभियानाला प्रतिसाद दिला आहे.

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

कारवाईसोबत पुनर्वसनालाही प्राधान्य

नवी मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि वितरण करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाया करण्यात येत आहेत. मात्र, केवळ कारवाई न करता व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनर्वसनावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नशामुक्त झालेल्या व्यक्तींना इतर तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी सहभागी करून घेण्याचे प्रयत्नही केले जात आहेत.

१० खाटांचे व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात वैद्यकीय उपचार, मानसोपचार, समुपदेशन तसेच निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, १० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी आवश्यक असलेली वैद्यकीय आणि मानसिक मदत एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम

नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका आणि तळोजा एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फीड एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’चेही उद्घाटन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरातील संशयास्पद हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे, गुन्ह्यांचा तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक वेगाने करणे शक्य होणार आहे. अमली पदार्थांच्या तस्करीवर पाळत ठेवण्यासाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.

विमानतळ पोलीस ठाणेही कार्यान्वित

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण ठरणारे विमानतळ पोलीस ठाणेही या कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात येणार आहे. सिडको आणि अदानी समूहाच्या सहकार्याने सुसज्ज इमारतीत हे पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. येथे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक आणि ४० पोलीस अंमलदार तैनात असणार आहेत.

असा होणार कार्यक्रम

शनिवारी सकाळी ११ वाजता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन करण्यात येईल. त्याचवेळी नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्याचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.

यानंतर सकाळी ११.३० वाजता नेरुळ येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे मुख्य कार्यक्रम पार पडेल. मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी १०.३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांकडून पथनाट्य, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नशाविरोधी जनजागृती करण्यात येणार आहे.

या वेळी नशाविरोधी जनजागृतीपर चित्रफितीचे प्रकाशन, ‘रील व पोस्टर’ स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव तसेच तीन प्राचार्यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथही देण्यात येणार आहे.

राज्यासाठी दिशादर्शक उपक्रम

नवी मुंबई पोलिसांनी जानेवारी २०२५ पासून ‘नशामुक्ती नवी मुंबई’ अभियान सुरू केले आहे. नागरिकांना अमली पदार्थांबाबत माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी ८८२८ ११२ ११२ ही हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र ‘अँटी नार्कोटिक्स सेल’ स्थापन करणारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय राज्यातील पहिले आयुक्तालय ठरले आहे. या निर्णयाची दखल घेत पुढे शासनाने राज्यभर अशा प्रकारची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला.

अमली पदार्थांविरोधातील कठोर पोलिसी कारवाईसोबतच विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांना या अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याने ‘नशामुक्ती नवी मुंबई’ अभियानाला व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

Web Title: Navi mumbai campus connect drug free campaign launch devendra fadnavis milind bharambe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Drugs
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
1

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न
2

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम
3

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.