Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: वाद, संताप आणि थेट रुळांवर…,धावत्या लोकलमधून 18 वर्षीय तरुणीला ढकललं; नवी मुंबई येथील घटना

नवी मुंबईतील पनवेल–खांदेश्वरदरम्यान धावत्या लोकलमध्ये 50 वर्षीय व्यक्तीने महिलांच्या डब्यात घुसून 18 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीला खाली ढकलले. तरुणी गंभीर जखमी असून आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 21, 2025 | 08:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • महिलांच्या डब्यातील वादातून संताप; तरुणीला धावत्या लोकलमधून ढकललं
  • पीडित तरुणी गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर
  • आरोपी शेख अख्तर नवाझ अटकेत; मानसिक अस्थिरतेचा प्राथमिक अंदाज
नवी मुंबई: नवी मुंबईमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लोकलमधील महिला डब्यात एक ५० वर्षीय पुरुष घुसला होता. महिलांनी त्याला जाब विचारला असता तो संतापला आणि त्याने एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिले. यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणी ही अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान घडली.

Dhule News: सेल्फी, ‘गुड बाय’आणि स्टेटस ठेवून तापी नदीत उडी; सुरतहून यात्रेसाठी गावी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

काय घडलं नेमकं?

जखमी पीडित तरुणी ही खारघर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पीडितेने आपल्या मैत्रिणींसह पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली होती. ती महिलांसाठी असलेल्या डब्यातून प्रवास करत होती. गाडी सुटत असतानाच एक ५० वर्षीय पुरुष हा महिला डब्यात चढला.

तर महिला प्रवाश्यांनी त्याला जाब विचारला आणि खाली उतरण्यास सांगितले. मात्र आरोपीने महिलांशी वाद घालण्यास सुरवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात त्याने धावत्या लोकलमधून १८ वर्षीय तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे तरुणी थेट रुळांवर पडली. यात तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला, कंबरेला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली. लोकलमधून खाली पडल्यानंतर जखमी अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. तिला तातडीने जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणीला ढकलल्यानंतर आरोपीने खांदेश्वर स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, डब्यातील सतर्क महिला प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना (GRP) याची माहिती दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत खांदेश्वर स्थानकातून आरोपीला अटक केली. शेख अख्तर नवाज (५०) असे आरोपीचे नाव आहे. पनवेल रेल्वे पोलिसांनी आरोपी शेख विरोधात बीएनएस कलम १०९, तसेच भारतीय रेल्वे अधिनियम कलम १६२ आणि १३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याचे शक्यता

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा एकटाच आहे, त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत. तो इकडे तिकडे फिरतो, प्राथमिक तपासात त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून येत असून, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जामखेडनंतर सासवडमध्येही एकाचा खून; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दुहेरी खूनाचा उलगडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये.

  • Que: आरोपीवर कोणती कारवाई?

    Ans: बीएनएस कलम 109 व रेल्वे अधिनियम कलम 162, 138 नुसार गुन्हा; पोलीस कोठडी.

  • Que: तरुणीची सध्याची स्थिती काय?

    Ans: गंभीर जखमा असून उपचारानंतर प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Navi mumbai crime 18 year old girl was pushed from a moving local train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Dhule News: सेल्फी, ‘गुड बाय’आणि स्टेटस ठेवून तापी नदीत उडी; सुरतहून यात्रेसाठी गावी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं
1

Dhule News: सेल्फी, ‘गुड बाय’आणि स्टेटस ठेवून तापी नदीत उडी; सुरतहून यात्रेसाठी गावी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

तांत्रिकाने जंगलात दोघांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केलं प्रवृत्त, अंगावर फेविकॉल ओतले अन्…, दोघांचाही नग्न अवस्थेत सापडले मृतदे
2

तांत्रिकाने जंगलात दोघांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केलं प्रवृत्त, अंगावर फेविकॉल ओतले अन्…, दोघांचाही नग्न अवस्थेत सापडले मृतदे

Extra Marital Affair! रागाच्या भरात विवाहित महिलेने प्रियकराचे कापले गुप्तांग, पुढच्याच क्षणी रक्ताच्या थारोळ्यात अर्धनग्न महिला
3

Extra Marital Affair! रागाच्या भरात विवाहित महिलेने प्रियकराचे कापले गुप्तांग, पुढच्याच क्षणी रक्ताच्या थारोळ्यात अर्धनग्न महिला

Chhatrapati Sambhajinagar Crime: गोदावरीत पोत्यात सापडलेले गूढ उकलले; मूकबधीर सासऱ्याची झोपेत हत्या; भाचा-जावईच निघाला मारेकरी
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: गोदावरीत पोत्यात सापडलेले गूढ उकलले; मूकबधीर सासऱ्याची झोपेत हत्या; भाचा-जावईच निघाला मारेकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.