‘गुड बाय’ असा इंस्टाग्रामवर स्टेटस
उमेश पाटील हा घरातील एकुलता एक मुलगा होता. तो रोजगारानिमित्त सुरत येथील एका कंपनीत काम करत होता. यात्रेनिमित्त दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी वाडी खुर्द येथे आला होता. आत्महत्येपूर्वी उमेशने इंस्टाग्रामवर ‘गुड बाय’ असा तापी नदीसोबतचा स्वतःचा सेल्फी फोटो स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या का केली यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं
धुळे जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. १५ डिसेंबरला एका वृद्ध महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तिच्याच घरी आढळून आला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र घटनास्थळी सापडलेल्या एका मनगटी घड्याळ आधारे स्थानिक गुन्हे शंकेने अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली आणि या गुन्ह्याचा उलगडा केला.
धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील दंडवाले बाबा नगर परिसरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत मृत महिला राहत होती. मृत महिलेचं नाव लीलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय ७५) असे आहे. या आजी घरात एकट्याच राहत होत्या. त्यांची परिस्थिती हालाकीची होती. पहाटे त्यांच्या घरातून रक्त बाहेर आल्याची माहिती शेजाऱ्यांना दिसले. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लीलाबाई यांचा मृतदेह घरातच आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला.
प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून वृद्धेवर अमानुष हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. घरातील काही साहित्य, स्वयंपाकघरातील डबे आणि गॅस सिलेंडर गायब असल्याचेही निदर्शनास आले. याप्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना तपासादरम्यान घटनास्थळी एक मनगटी घड्याळ सापडले. या घडाळ्याच्या आधारे तपासाला गती मिळाली. पोलिसांनी या घड्याळीचे फोटो परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आला.
एका बातमीदाराने याच घड्याळाच्या आधारे पोलिसांना महत्वाची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर राजू कोळी (वय 25, रा. वाल्मिकी आंबेडकर वसाहत, मोहाडी) याच्यावर संशय बळावला. पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता तो आपल्या घरी किंवा ओळखीच्या ठिकाणी सापडत नव्हता. पोलिसांनी त्याच्या तपासाची सुरुवात केली. तेव्हा तो महेबूब सुबानी दर्याजवळील सुरत बायपास परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याला तेथून ताब्यात घेतले.
Ans: शिरपूर तालुक्यातील तापी पुलावर.
Ans: इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टेटस व सेल्फी पोस्ट केली.
Ans: नाही, कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.






